जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Ganesh Utsav 2023: यंदा गणपती बाप्पाचं कधी होणार आगमन? मूर्ती स्थापनेसाठी यावेळात मुहूर्त

Ganesh Utsav 2023: यंदा गणपती बाप्पाचं कधी होणार आगमन? मूर्ती स्थापनेसाठी यावेळात मुहूर्त

गणेशोत्सव 2023

गणेशोत्सव 2023

Ganesh Utsav 2023: गणेश उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला संपतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 जुलै : हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला संपतो. यंदाचा गणेशोत्सव 19 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे. 28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चतुर्थीला संपेल. या दिवशी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. गणेश चतुर्थी 2023 शुभ मुहूर्त - भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी सुरू होईल - 18 सप्टेंबर 2023 दुपारी 12.39 वाजता भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी समाप्त - 19 सप्टेंबर 2023 दुपारी 01:43 वाजता गणेश स्थापनेची वेळ - 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11.07 ते दुपारी 01.34 पर्यंत

News18लोकमत
News18लोकमत

गणेश उत्सवाचे महत्त्व - पौराणिक कथेनुसार, गणेशाची निर्मिती देवी पार्वतीने चंदनाच्या लेपापासून केली होती. तो चंदनाचा लेप पार्वती माता स्नानासाठी वापरली होत्या. शक्तीची देवता असल्यानं पार्वतीने गणेशाला अशा सामर्थ्याने जागृत केले की सर्वात मोठे देवही गणेशाला युद्धात तोंड देऊ शकले नाहीत. एकदा स्वत: शिव देवी पार्वतीला भेटायला आले. पण गणपतीने त्यांना दारात अडवले, आत येण्यास नकार दिला. भगवान शिव खूप क्रोधित झाले आणि त्यांनी रागात गणेशाचे मस्तक कापले. हा प्रकार समजल्यानंतर माता पार्वतीला खूप राग आला. आपल्या पत्नीला संतुष्ट करण्यासाठी, भगवान शिवाने इतर देवतांसह हत्तीचे डोके गणेशाच्या धडाला जोडले. त्यामुळे हत्तीचे तोंड असलेला गणेश झाला. असे मानले जाते की, गणेश उत्सवात गणेशाची विधिवत पूजा केल्याने गणपती मनुष्याला प्रत्येक संकटातून मुक्त करतो. सुख-समृद्धीसोबतच श्रीगणेश भक्तांना संपत्तीचा आशीर्वाद देतात. या जन्मतारखांच्या महिला असतात मेहनती! कुटुंबाची एकहाती करू शकतात प्रगती गणेशोत्सव 10 दिवस का साजरा करायचा? शास्त्रानुसार, गणेशाचा जन्म भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला झाला होता. यासाठी गणेशोत्सव साजरा केला जातो. याशिवाय, आणखी एका आख्यायिकेनुसार, महर्षी वेद व्यासांनी गणेशाला महाभारत रचण्यासाठी आमंत्रण दिले. गणेश न थांबता व्यासजींनी सांगितलेले श्लोक लिहित राहिला. 10 दिवस सतत लिहिल्यामुळे गणेशजींवर धूळ आणि मातीचा थर साचला. 10 दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्दशीला बाप्पाने सरस्वती नदीत स्नान करून स्वतःची स्वच्छता केली. त्यामुळे गणेशोत्सव 10 दिवस साजरा केला जातो. घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; सोमवती अमावस्येला करा हे उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात