मुंबई, 15 नोव्हेंबर : तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीचे रोप हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. याशिवाय तुळशीच्या रोपामध्ये अनेक देवता वास करत असल्याचा उल्लेखही धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. तुळशीचे महत्त्व अध्यात्मिक तर आहेच, पण ही वनस्पती औषधी गुणांनीही परिपूर्ण आहे. तुळशीची पाने, डहाळ्या, मुळे किंवा त्याच्या बिया या सर्वांचा उपयोग विविध प्रकारची औषधे म्हणून केला जातो. वास्तुशास्त्रातही घरात तुळशीचे रोप लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा तुळस सुकली तर ती कशी वापरता येईल याबद्दल अधिक माहिती देत आहेत. 1. सुकलेली तुळशी भगवान श्रीकृष्णाला प्रिय - धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची कोरडी/सुकलेली पाने भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असतात. असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने 15 दिवस वापरता येतात. 2. परमेश्वराला तुळशीच्या पाण्याने स्नान - जर तुम्ही कृष्णाच्या बालस्वरूपाला स्नान घालणार असाल तर या पाण्यात तुम्ही सुखलेली तुळशीची पाने टाकू शकता. याशिवाय तुम्ही स्वतःच्या आंघोळीसाठी वापरलेल्या पाण्यात तुळशीची पाने टाकू शकता. असे केल्याने शरीरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, असे मानले जाते. 3. संपत्तीच्या ठिकाणी तुळशी ठेवा - धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची सुकलेली पाने एका स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यात बांधून घरात पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला होतो.
4. घरात तुळशीचे पाणी शिंपडा - धार्मिक मान्यतेनुसार, घरामध्ये गंगाजलात तुळशीची कोरडी पाने घालून शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते. यासोबतच घरात समृद्धी राहते. वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)