मराठी बातम्या /बातम्या /religion /आज संकष्ट चतुर्थी; सुकर्म योगात गणेश पूजा करण्याचा योग, व्रत करणाऱ्यांनी पहा मुहूर्त

आज संकष्ट चतुर्थी; सुकर्म योगात गणेश पूजा करण्याचा योग, व्रत करणाऱ्यांनी पहा मुहूर्त

माघ संकष्ट चतुर्थी व्रताची माहिती

माघ संकष्ट चतुर्थी व्रताची माहिती

या वेळची द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी सुकर्म योगात आहे. या योगात उपासना केल्यानं शुभ फळ मिळतं. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी व्रताची उपासना वेळ आणि या व्रताचे विशेष चार फायदे सांगितले आहेत.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 फेब्रुवारी : माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी व्रत आज 09 फेब्रुवारी गुरुवारी आहे. हे द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी व्रत आहे, ज्याला माघ संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीला वेगळे नाव आहे. या वेळची द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी सुकर्म योगात आहे. या योगात उपासना केल्यानं शुभ फळ मिळतं. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी व्रताची उपासना वेळ आणि या व्रताचे विशेष चार फायदे सांगितले आहेत.

सुकर्म योगात द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी व्रत

09 फेब्रुवारी रोजी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा सुकर्म योग सकाळपासून सुरू होणार असून तो सायंकाळी 04.46 पर्यंत राहील. सुकर्म योगात केलेले कार्य शुभ फळ देते, असे मानले जाते. अशा स्थितीत द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी व्रताची सकाळी पूजा करावी.

द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी 2023 पूजा मुहूर्त

09 फेब्रुवारी रोजी सकाळी 07:05 ते 08:27 दरम्यान शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर दुपारी 12:35 ते 01:58 पर्यंत लाभ उन्नती मुहूर्त आणि दुपारी 01:58 ते 03:21 पर्यंत अमृत हा उत्तम मुहूर्त आहे. या दिवशी या मुहूर्तांवर तुम्ही तुमच्या सोयीनुसार द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीची पूजा करू शकता.

संकष्ट चतुर्थी चंद्रोदयाची वेळ

उपवासाच्या दिवशी चंद्र 09:34 वाजता उगवेल. महाराष्ट्र राज्यासाठीची ही सर्वसाधारण वेळ आहे. या वेळेपासून तुम्ही चंद्राची पूजा करून आणि अर्घ्य देऊन व्रत पूर्ण करू शकता.

संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे फायदे

1. जर तुम्ही एखाद्या संकटात अडकला असाल आणि त्यातून बाहेर पडायचे असेल तर संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे. श्रीगणेश तुमच्या मनोकामना पूर्ण करतील.

2. कोणतेही कार्य सफल होत नसेल, अनेक कामांमध्ये अडथळे येत असतील तर संकष्टी चतुर्थीचे व्रत करून गणपती बाप्पाची पूजा करावी.

3. जर तुमच्या घरात वास्तुदोषांमुळे अडचणी येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी गणेशाची मूर्ती स्थापित करा. श्रीगणेश हे शुभाचे प्रतीक आहे, सर्व दोष दूर होतील.

4. घरात नेहमी अशांततेचे वातावरण असते, जर नकारात्मकता असेल तर ती दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवा आणि गणेशाची पूजा करा. आर्थिक लाभही मिळतील.

हे वाचा - या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Ganesh chaturthi, Religion