जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / 'या' टेकडीवर आहे हिंदूंची अपार श्रद्धा; बौद्ध अनुयायीही मानतात

'या' टेकडीवर आहे हिंदूंची अपार श्रद्धा; बौद्ध अनुयायीही मानतात

या गुहा देवस्थानाच्या अस्तित्त्वामागे एक रंजक कथा आहे.

या गुहा देवस्थानाच्या अस्तित्त्वामागे एक रंजक कथा आहे.

ही टेकडी पर्यटकांच्या आकर्षणाचं जणू केंद्रबिंदूच आहे. दरवर्षी हजारो हिंदू भाविक आणि बौद्ध अनुयायी याठिकाणास भेट देतात.

  • -MIN READ Local18 Gaya,Bihar
  • Last Updated :

कुंदन कुमार, प्रतिनिधी गया, 11 जून : बिहारच्या गया जिल्ह्यात बोधगयापासून साधारणतः 12 किलोमीटर उत्तर-पूर्वेस एक सुंदर टेकडी आहे. ‘डुंगेश्वरी’ या नावाने ओळखली जाणारी ही टेकडी पर्यटकांच्या आकर्षणाचं जणू केंद्रबिंदूच आहे. दरवर्षी हजारो हिंदू भाविक आणि बौद्ध अनुयायी याठिकाणास भेट देतात. या टेकडीच्या माथ्यावर एक प्राचीन गुहा असून त्यात एक छोटंसं देवस्थान आहे. या गुहेला महाकाल गुहा किंवा प्रयाग बोधी गुहा असं म्हटलं जातं. पर्यटन हंगामात याठिकाणी बौद्ध अनुयायी येतात, तर नवरात्री आणि श्रावण महिन्यात इथे हिंदू भाविकांची गर्दी दिसून येते. ही गुहा म्हणजे डोंगरावर बांधलेल्या सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे. येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीसह हिंदू देवी-देवतांच्या मूर्तीही स्थापित केलेल्या आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

या गुहा देवस्थानाच्या अस्तित्त्वामागे एक रंजक कथा आहे. असं म्हणतात की, सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी बोधगयाला जाण्यापूर्वी या गुहेत तब्बल 6 वर्ष ध्यान केलं होतं. या तपश्चर्येदरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. त्यावेळी जवळच्याच गावातील सुजाता या महिलेने त्यांना खीर दिली होती. तिथूनच भगवान बुद्धांना पुढील मार्गाचं ज्ञान मिळालं असं म्हटलं जातं. या तपश्चर्येनंतर ते बोधगयाला गेले. बोधगयाला येणारे बौद्ध अनुयायी डुंगेश्वरी मंदिरास न चुकता भेट देतात. या मंदिरात आल्याशिवाय त्यांचा हा प्रवास पूर्ण होत नाही, असं मानलं जातं. येथे आल्यावर अपार शांतात आणि प्रचंड आनंद मिळतो, असं पर्यटक म्हणतात. त्याचबरोबर गया येथे येणारे देशी-विदेशी पर्यटकही डुंगेश्वरी टेकडीला नक्कीच भेट देतात. बॅडमिंटन खेळताना आला हृदयविकाराचा झटका अन्…, घटनेने सर्वांनाच बसला धोका डुंगेश्वरी टेकडीवरील गुहेत बांधलेल्या या देवस्थानात जाण्यासाठी अनेक पायऱ्या आहेत. परंतु वृद्ध पर्यटकांसाठी पालखीने जाण्याचीही सोय आहे. खरंतर पूर्वी या देवस्थानाचं नाव ‘दुर्गेश्वरी’ होतं, पुढे ते बदलून डुंगेश्वरी असं करण्यात आलं. माँ दुर्गेश्‍वरी येथे वर्षानुवर्षे विराजमान आहे. तर, 2500 वर्षांपूर्वी जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध राजगीरहून बोधगयाला जात होते. तेव्हा त्यांनी या गुहेत 6 वर्षे तपश्चर्या केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात