मुंबई, 02 नोव्हेंबर : शुक्रवार हा शुक्र ग्रहाचे प्रतीक आहे. शुक्र हा शारीरिक सुख आणि सुविधा पुरवण्याचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असतो, तेव्हा पैसा, संपत्ती, सुख आणि सुविधा यांची कमतरता नसते. ती व्यक्ती ऐश्वर्य आणि वैभवाने परिपूर्ण जीवन जगते. याउलट, शुक्र दुर्बल असताना व्यक्तीच्या जीवनात धन, सुख आणि सुविधांचा अभाव निर्माण होतो. प्रत्येक व्यक्तीच्या मनात आनंदी जीवनाची इच्छा असते. ती पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न आणि उपाय करतो. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला बलवान बननण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. शुक्र स्तोत्र हे त्यापैकीच एक. शुक्र स्तोत्राचे पठण करणे लाभदायक आहे. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की, कुंडलीतून शुक्र दोष दूर करण्यासाठी किंवा शुक्र बलवान करण्यासाठी तुम्ही दर शुक्रवारी शुक्राच्या बीज मंत्राचा जप करावा. हे जमत नसेल तर दर शुक्रवारी शुक्र स्तोत्राचे पठण करावे. याचाही फायदा होईल. शुक्र स्तोत्राचे पठण करण्यापूर्वी स्नानानंतर पांढरे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर लक्ष्मीची पूजा करावी. नंतर शक्यतो पांढऱ्या आसनावर बसून शुक्र स्तोत्राचे पठण करावे. हा स्तोत्र संस्कृतमध्ये लिहिलेला आहे, तो वाचताना बरोबर उच्चारला पाहिजे. शुक्र स्तोत्राचे पावित्र्य व विधीपूर्वक पाठ करणे लाभदायक असते. शुक्र स्तोत्र नमस्ते भार्गव श्रेष्ठ देव दानव पूजित। वृष्टिरोधप्रकर्त्रे च वृष्टिकर्त्रे नमो नम:।। देवयानीपितस्तुभ्यं वेदवेदांगपारग:। परेण तपसा शुद्ध शंकरो लोकशंकर:।। प्राप्तो विद्यां जीवनाख्यां तस्मै शुक्रात्मने नम:। नमस्तस्मै भगवते भृगुपुत्राय वेधसे।। तारामण्डलमध्यस्थ स्वभासा भसिताम्बर:। यस्योदये जगत्सर्वं मंगलार्हं भवेदिह।। अस्तं याते ह्यरिष्टं स्यात्तस्मै मंगलरूपिणे। त्रिपुरावासिनो दैत्यान शिवबाणप्रपीडितान।। विद्यया जीवयच्छुक्रो नमस्ते भृगुनन्दन। ययातिगुरवे तुभ्यं नमस्ते कविनन्दन।। बलिराज्यप्रदो जीवस्तस्मै जीवात्मने नम:। भार्गवाय नमस्तुभ्यं पूर्वं गीर्वाणवन्दितम।।
जीवपुत्राय यो विद्यां प्रादात्तस्मै नमोनम:। नम: शुक्राय काव्याय भृगुपुत्राय धीमहि।। नम: कारणरूपाय नमस्ते कारणात्मने। स्तवराजमिदं पुण्य़ं भार्गवस्य महात्मन:।। य: पठेच्छुणुयाद वापि लभते वांछित फलम। पुत्रकामो लभेत्पुत्रान श्रीकामो लभते श्रियम।। राज्यकामो लभेद्राज्यं स्त्रीकाम: स्त्रियमुत्तमाम। भृगुवारे प्रयत्नेन पठितव्यं सामहितै:।। अन्यवारे तु होरायां पूजयेद भृगुनन्दनम। रोगार्तो मुच्यते रोगाद भयार्तो मुच्यते भयात।। यद्यत्प्रार्थयते वस्तु तत्तत्प्राप्नोति सर्वदा। प्रात: काले प्रकर्तव्या भृगुपूजा प्रयत्नत:।। सर्वपापविनिर्मुक्त: प्राप्नुयाच्छिवसन्निधि:।। वाचा - ‘चोर’ ते ‘रोग’.. पंचकाचे आहेत इतके प्रकार; अग्नी पंचकात का टाळावीत शुभ कार्ये? (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)