मुंबई,13 जुलै : हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. घर बांधण्यापासून ते आतील सर्व रचनांपर्यंत वास्तुशास्त्राचे नियम पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे घरात पैसे ठेवण्याच्या जागेबाबत अर्थात तिजोरीबाबतही काही नियम सांगितले आहेत. घरात पैसे ठेवण्यासाठी प्रत्येकाची एक खास जागा असते, ते सुरक्षित ठिकाण मानले जाते. वास्तुशास्त्रात या स्थानाची विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. उदा. पैशाच्या तिजोरीजवळ काही वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. पैसा, मौल्यवान वस्तूंच्या सोबत कोणत्या वस्तू ठेवणे योग्य नाही, याविषयी ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया. 1. झाडू: हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार माता लक्ष्मी तिजोरीत वास करते, असे मानले जाते. म्हणूनच तिजोरीजवळ चुकूनही झाडू ठेवू नये. असं करणं अशुभ मानलं जातं. तिजोरीजवळ झाडू ठेवल्याने धनाचा नाश होतो, असे मानले जाते. म्हणूनच चुकूनही झाडू तिजोरीजवळ राहणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे घरात आर्थिक मंदी येऊ शकते. घरात अडचणी वाढू शकतात. म्हणूनच ही चूक कधीही करू नये.
2. खरकटी भांडी: ज्या ठिकाणी स्वच्छता असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो. जिथे घाण असते तिथे धनाची देवी लक्ष्मी येत नाही. तिजोरीजवळही स्वच्छता ठेवावी. तिजोरीजवळ खरकटी भांडी कधीही ठेवू नयेत. हे अत्यंत अशुभ मानले जाते. तसेच घरात कुठेही पैसे ठेवू नयेत, अस्वच्छ ठिकाणी चुकूनही पैसे ठेवू नयेत. कारण तो लक्ष्मी मातेचा अपमान मानला जातो. यामुळे घरात पैसा येत नाही. म्हणूनच तिजोरीजवळ नेहमी स्वच्छता ठेवा. यामुळे देवी लक्ष्मीचा निवास होईल. घरात सुख-शांती नांदेल. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास 3. काळे कापड: तिजोरीजवळ किंवा जिथं पैसे, मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असतील तेथे काळे कापड कधीही ठेवू नका, ते खूप अशुभ मानलं जातं. यामुळे संपत्ती नष्ट होण्याची भीती असते. दागिने किंवा पैसे कधीही काळ्या कपड्यातही बांधून ठेवू नका. या चुकीचा पद्धतीमुळं आर्थिक समृद्धीवर वाईट परिणाम होतो. म्हणूनच अशा गोष्टी चुकूनही करू नका. श्रावण सुरू होताच राशीनुसार करा या गोष्टी; शंभू-महादेव अडचणींमध्ये दाखवतील मार्ग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)