मराठी बातम्या /बातम्या /religion /देव दीपावलीच्या उत्सवासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त, योग, पूजा पद्धती आणि महत्त्व

देव दीपावलीच्या उत्सवासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त, योग, पूजा पद्धती आणि महत्त्व

देव दीपावली

देव दीपावली

Dev Diwali 2022: त्रिपुरासुर मारला गेला तेव्हा सर्व देवी-देवता आनंदी झाले आणि ते शंकराची नगरी काशीला आले. तिथे गंगेच्या तीरावर दीपप्रज्ज्वलन करून त्यांनी उत्सव साजरा केला होता. तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेला देव दीपावली साजरी केली जाते.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Kolhapur, India

    मुंबई, 07 नोव्हेंबर : आज (7 नोव्हेंबर) देव दीपावली आहे. कार्तिक पौर्णिमेला प्रदोषकालात देव दीपावली साजरी केली जाते. या दिवशी हिंदू देवता शंकराची नगरी असलेल्या काशीमध्ये गंगा नदीच्या काठावर देव दीपावलीचा भव्य महोत्सव साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक पौर्णिमेला सर्व देवी-देवता काशीमध्ये दिवा लावून उत्सव साजरा करतात. म्हणून याला देव दीपावली म्हणतात. जगन्नाथपुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा हे मूळचे काशीचे आहेत. त्यांनी देव दीपावलीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व याबद्दल माहिती दिली आहे.

    या वर्षीच्या देव दीपावलीचा मुहूर्त

    कार्तिक पौर्णिमेचा प्रारंभ: आज म्हणजे सोमवारी संध्याकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे.

    कार्तिक पौर्णिमा समाप्ती: उद्या म्हणजे मंगळवारी दुपारी 4 वाजून 31 मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे.

    सिद्धी योग : आज (सोमवार) सकाळपासून ते रात्री 10 वाजून 37 मिनिटांपर्यंत सिद्धी योग असेल.

    रवि योग: आज सकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी रवि योगाला सुरुवात होईल. रात्री 12 वाजून 37 मिनिटांपर्यंत रवि योग सुरू असेल.

    देव दीपावलीचा शुभ मुहूर्त

    7 नोव्हेंबर रोजी देव दीपावली साजरी करता येईल. संध्याकाळी 5 वाजून 14 मिनिटांपासून ते 7 वाजून 49 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या वर्षी देव दीपावलीची पूजा करण्यासाठी दोन तास 35 मिनिटांचा शुभ मुहूर्त आहे.

    देव दीपावलीची पूजा कशी करावी?

    आज (सोमवार) सकाळी प्रत्यक्ष नदीत किंवा घरातील आंघोळीच्या पाण्यात गंगाजल पाणी मिसळून स्नान करावं. त्यानंतर भगवान शंकरांची विधिवत पूजा करावी. संध्याकाळी शुभ मुहूर्तावर नदी, सरोवर किंवा तलावाच्या काठी जा. तिथे भगवान शिव आणि इतर देवतांचे स्मरण करून तुपाचा दिवा लावावा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरातील देवघरात किंवा कोणत्याही मंदिरात देव दीपावलीचा दिवा लावू शकता. घराजवळ शिवमंदिर असेल तर तिथे केलेलं दीपदान अधिक शुभ ठरेल.

    देव दीपावलीचं महत्त्व

    पुराणातील कथांनुसार, कार्तिक पौर्णिमेला शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे देवतांसह सामान्य जनता राक्षसाच्या अत्याचारापासून मुक्त झाली. म्हणून कार्तिक पौर्णिमेला भगवान शंकराची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. जेव्हा त्रिपुरासुर मारला गेला तेव्हा सर्व देवी-देवता आनंदी झाले आणि ते शंकराची नगरी काशीला आले. तिथे गंगेच्या तीरावर दीपप्रज्ज्वलन करून त्यांनी उत्सव साजरा केला होता. तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेला देव दीपावली साजरी केली जाते.

    हे वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

    (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

    First published:

    Tags: Diwali, Diwali Fashion, Religion