मुंबई, 07 डिसेंबर : मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. आज (7 डिसेंबर) रोजी दत्त जयंती आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे. या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त महाराजांची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रूपांची मंदिर आहेत. मात्र, मुंबईतील कुर्ला परिसरात श्री सर्वेश्वर महादेव मंदिर मार्गावर एकमेव श्री काळा दत्त मंदिर आहे.
कधी झाली मंदिराची स्थापना?
कुर्ला परिसरात अनेक गिरणी कामगार वास्तव्यास राहत होते. त्याकाळी कुर्ल्यातील स्वदेशी मिल जवळ असल्या कारणांमुळे गिरणी कामगार कुर्ल्यातील ताकियावार्ड परिसरात मोठ्या संख्येने राहत होते. याच भागात अनेक जुनी मंदिरे आहेत. त्यातीलच एक गिरणी कामगार आणि स्थानिकांच श्रध्दास्थान असलेलं श्री काळा दत्त मंदिर. कुर्ल्यातील श्री काळा दत्त मंदिराची स्थापना ही 1992 साली झाली. माजी नगरसेवक माधवराव पेडणेकर तसेच स्थानिक रहिवाशांच्या इच्छेतून हे मंदिर उभारण्यात आले.
Datta Jayanti : भक्ताच्या नावानं ओळखलं जाणारं पुण्यातील 125 वर्ष जुनं दत्त मंदिर, Video
मंदिराची रचना
मंदीर हे संगमरवरी दगडापासून बनवलेलं आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला औदुंबराच झाड आहे. या झाडाखाली श्री काळा दत्त महाराजांची मूर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात श्री दत्त महाराजांची मूर्ती आणि पादुका आहेत. तसेच गाभाऱ्यात एका बाजूस दगडी गणपती आणि हनुमानाची मूर्ती आहे. सकाळी 06 वाजेपासून दररोज मंदिराचे प्रवेशद्वार भक्तांसाठी उघडले जाते. मंदिराच्या परिसरात लहान सुशोभीकरणाची रोप लावण्यात आली आहेत.
हे कार्यक्रम मंदिरात होतात साजरे
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता. हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्री काळा दत्त मंदिरात दत्तगुरूंचा जन्मकाळ सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री काळा दत्त मंडळाने केले आहे. यावेळी सत्यनारायणाची महापूजा, काकड आरती, जन्मोत्सव सोहळा गिरणी कामगार आणि स्थानिकांच्या उपस्थितीत पार पडतो. दरवर्षी मुंबईतून हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात, असं मंदिराचे विश्वस्त अक्षय तरळकर यांनी सांगितले.
Datta Jayanti : शेकडो वर्षांचा इतिहास असणारं बीडमधील पहिलं दत्त मंदिर, पाहा Video
काळा दत्त मंदिर पूर्ण पत्ता
3V6F+VQ5, कुर्ला पश्चिम, कुर्ला, मुंबई, महाराष्ट्र 400070
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Datta Jayanti, Local18, Mumbai, Religion