पुणे, 7 डिसेंबर : पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सुप्रसिद्ध आहे. जगभरातील असंख्य भाविक या मंदिराला भेट देत असतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी या गणपतीची स्थापना केली. या गणपती मंदिराबरोबरच या ट्रस्टनं स्थापन केलेलं दत्त मंदिरही शहरात प्रसिद्ध आहे. या मंदिराला तब्बल 125 वर्षांचा इतिहास असून दत्त जयंतीच्या निमित्तानं हा इतिहास जाणून घेऊन या
कधी झाली स्थापना?
दगडूशेठ हलवाई यांच्या मृत्यूनंतर पत्नी लक्ष्मीबाई निराश झाल्या होत्या. त्यावेळी त्यांचे आध्यात्मिक गुरु माधवनाथ महाराजांनी हलवाई यांच्या राहत्या घरी दत्त मूर्तीची स्थापना केली आणि लक्ष्मीबाईंना पुढील आयुष्य दत्त महाराजांच्या सानिध्यात घालवावे असे सांगितले. त्यांनी दगडूशेठ गणपती सोबतच श्री दत्तगुरूंच्या देखील मूर्तीची स्थापना केली. श्री दगडूशेठ गणपती आणि श्री दत्तांची त्यांनी मनोभावे पूजा केली. हेच ते श्री दत्तगुरूंचे पुण्यातील सुप्रसिद्ध असे दत्त मंदिर होय! बहुतेक मंदिरं देवाच्या नावाने ओळखली जातात मात्र श्री दत्तगुरूंचे आणि गणपतीचे मंदिर हे दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई यांच्या नावाने ओळखले जाते.
या मंदिराची स्थापना झाल्यावर अनेक साधुसंतांनी या मंदिराला भेट दिली होती. पुणे शहरातील सद्गुरु शंकर महाराज हे देखील नित्यनेमाने दत्त मंदिरात येत असत. 'माझी अंत्ययात्रा ही दत्तगुरुंच्या मंदिरासमोरुन न्यावी, असं त्यांनी शंकर गीतेमध्ये लिहून ठेवलं होतं. हे मंदिर फक्त सर्वसामान्यच नाही तर आध्यात्मिक उंची असलेल्या सद्गुरूंचेही श्रद्धास्थान आहे.
आंघोळीसाठी गेलेल्या भक्ताच्या हातात आली मूर्ती, पाहा एकमुखी दत्त मंदिराचा इतिहास, Video
125 वर्षांचा इतिहास
पुण्यातील मंडई जवळील बुधवार पेठ येथे हे दत्त मंदिर असून या मंदिराला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे. या निमित्ताने वर्षभर मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दत्त संप्रदायाचे भाविक, साधुसंत आणि असंख्य लोक या मंदिराला दत्त जयंतीनिमित्त विशेष भेट देतात.
हे दत्त मंदिर जागृत असून आपण मागितलेली इच्छा दत्तगुरु अतिशय प्रेमाने पूर्ण करतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. या मंदिरात दत्ताची संगमरवरी मूर्ती असून त्यावर निरागस असे भाव आहे. दत्तांच्या डोळ्यातून कैवल्यामृत वाहते. अशा प्रकारे अतिशय सुंदर डोळे ह्या दत्तमूर्तीचे आहेत. या मंदिराला 125 वर्षे पूर्ण झालेली आहेत.
शेकडो वर्षांचा इतिहास असणारं बीडमधील पहिलं दत्त मंदिर, पाहा Video
गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती निमित्त दत्तांच्या मूर्तीला सोन्याचा अंगरखा घातला जातो. संपूर्ण मंदिर हे सुंदर फुलांची सजावट करून सजवले जाते, अशी माहिती मंदिराचे कार्यकारी विश्वस्त शिवराज कदम जहागीरदार यांनी दिली.
गुगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Datta Jayanti, Local18, Pune, Religion