औरंगाबाद, 07 डिसेंबर : गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करता आले नाही. मात्र, आता कोरोना संसर्गजन्य आजाराची लाट ओसरल्यामुळे दोन वर्षानंतर यंदा सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. दरवर्षी उत्साहात साजरी होणारी दत्त जयंती देखील यावर्षी मोठ्या उत्साहात वेगवेगळे उपक्रम राबवत साजरी केली जात आहे. औरंगाबाद शहरातील सिडको भागात असलेल्या दत्त मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निम्मित वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यंदा मंदिर परिसरामध्ये दत्त यंत्राच्या आकारात आरास करत 11 हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दोन वर्षानंतर साजरा होणारा हा उत्सव बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
परिसरात निघते भिक्षा फेरी
दत्त जयंती सर्वत्र साजरी होत असते मात्र आम्ही यामध्ये नवनवीन उपक्रम राबवत असतो. यातलाच एक म्हणजे दत्त चरित्रात लिहिल्याप्रमाणे दत्त महाराज भिक्षा मागत होते. त्याचाच भाग म्हणून या ठिकाणच्या परिसरामध्ये सर्व भाविकांची भिक्षा फेरी काढली जाते. जमा झालेले धान्य जमा केलं जातं. यात गरिबातल्या गरीब घरातील भाविकांचा सहभाग या उत्सवात असला पाहिजे. त्याला हा उत्सव आपला वाटला पाहिजे यासाठी हा उपक्रम राबवला जातो. तसेच आम्ही या ठिकाणी 16 वर्षांपासून दीपोत्सव सुध्दा साजरा करतो, असं दत्त मंदिराचे विश्वस्त गणेश जोशी यांनी सांगितलं.
Datta Jayanti : ब्रिटीश अधिकाऱ्याच्या पुतळ्यापासून साकारली दत्ताची मूर्ती, पाहा Video
मंदिर परिसरात राबवण्यात आले हे उपक्रम
या वर्षी मंदिर परिसरात पुष्पअर्चन सोहळा, तुळशी सोहळा, एकादशी निमित्त 52 हजार तुळशींचा अभिषेक, दत्त जयंती निम्मत मंदिर परिसरामध्ये तब्बल 11 हजार दिवे लावण्यात आले.
11 हजार दिवे एकाच ठिकाणी लावण्यात येणार असल्यामुळे हे विहंगम दृश्य बघण्याची उत्सुकता मनामध्ये होती आणि यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी लावण्यात आलेले दिवे पाहून छान वाटलं, असं भाविक अदिती पाटीलने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad News, Datta Jayanti, Local18, Religion