मराठी बातम्या /बातम्या /religion /

Dahihandi 2022 : कशी सुरू झाली दहीहंडीची प्रथा?

Dahihandi 2022 : कशी सुरू झाली दहीहंडीची प्रथा?

गोविंदांच्या सरकारी नोकरीवर विद्यार्थी भडकले

गोविंदांच्या सरकारी नोकरीवर विद्यार्थी भडकले

जन्माष्टमीनंतर सर्वांचा खूप आवडता दहीहंडीचा एक सोहळाही साजरा केला जातो. दहीहंडी फोडल्याशिवाय आपल्याकडे जन्माष्टमी अपूर्ण वाटते. दहीहंडीला गोपाळकाला म्हणूनही ओळखले.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 19 ऑगस्ट : कृष्ण जन्माष्टमीला सर्व लोक विष्णू देवांचा आठवा अवतार मानल्या जाणार्‍या श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतात. त्यांचा जन्म मथुरा-वृंदावन प्रदेशात झाला होता आणि म्हणून हा सण तिथे मोठ्या थाटामाटात आणि जोमाने साजरा केला जातो. मात्र जन्माष्टमीनंतर सर्वांचा खूप आवडता दहीहंडीचा एक सोहळाही साजरा केला जातो. दहीहंडी फोडल्याशिवाय आपल्याकडे जन्माष्टमी अपूर्ण वाटते. आज आम्ही तुम्हाला या दहीहंडीला कशी सुरुवात झाली तिचे महत्व काय आणि यावर्षी दहीहंडीचा शुभ मुहूर्त काय याबद्दल माहितीत देणार आहोत. दहीहंडीला सुरुवात कशी झाली आणि तिचे महत्व काय? हिंदू पौराणिक कथेनुसार, श्रीकृष्णांना लहानपणी पांढरे लोणी, दही आणि दूध खायला खूप आवडत होते. त्यासाठी श्रीकृष्ण स्वतःच्या घरातून, मित्रांसह शेजारी व इतर ग्रामस्थांकडूनही दही, दूध, लोणी चोरून आणत असत. त्यामुळे त्यांची अजूनही काही नावं पडली. जशी की, "नवनीत चोर" किंवा "माखन चोर"

Janmashtami 2022 : जन्माष्टमीला करा बासरीशी संबंधित हे उपाय; अनेक अडचणी, संकटं सहज होतील दूर

जेव्हा ग्रामस्थांनी श्रीकृष्णांच्या आई यशोदा यांच्याकडे चोरीची तक्रार केली तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला रोखण्याच्या प्रयत्नात रागाने त्यांचे हात बांधले. तसेच त्यांनी गावकऱ्यांना ताजे मंथन केलेले पांढरे लोणी मातीच्या भांड्यात म्हणजेच हंडीमध्ये अशा उंचीवर लपवून ठेवण्याचा सल्ला दिला जेथे बाळ कृष्ण पोहोचू शकणार नाही. पण श्रीकृष्ण तेव्हढ्यावरही थांबले नाही. त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी हंडीपर्यंत पोहोचण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी ते लोणी मिळवण्यासाठी हंडी फोडली. श्रीकृष्णाना लोणी इतके आवडते म्हणून लोक दरवर्षी दहीहंडी फोडण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवतात आणि दही, माखन (लोणी), तूप, मिठाई आणि काजू असलेली हंडी फोडतात. दरवर्षी होणारे उत्सव पाहण्यासारखे असतात.

Janmashtami 2022: भगवान श्रीकृष्ण मोरपंखी मुकुट धारण करण्याचेही आहे खास कारण

दहीहंडी 2022 मुहूर्त दहीहंडीला गोपाळकाला म्हणूनही ओळखले जाते आणि ती जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी जन्माष्टमीची अष्टमी तिथी 18 ऑगस्ट म्हणजेच गुरुवारी रात्री 09:21 वाजता सुरू होईल आणि 19 ऑगस्ट म्हणजेच शुक्रवार रात्री 10:59 वाजता समाप्त होईल. म्हणजेच 19 ऑगस्टला आपल्याकडे दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
First published:

Tags: Lifestyle, Religion, Sangharsh dahi handi, Shri krishna janmashtami

पुढील बातम्या