जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणात काय खावं, काय खाऊ नये? कोणी कशी घ्यावी काळजी

Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणात काय खावं, काय खाऊ नये? कोणी कशी घ्यावी काळजी

चंद्रग्रहणात काय खाऊ नये

चंद्रग्रहणात काय खाऊ नये

यावेळचं चंद्रग्रहण रात्री पावणे नऊच्या सुमारास सुरू होणार असल्यानं शक्यतो त्या आधीच खाऊन घ्यावं. ग्रहणादरम्यान साधारणपणे कोणीही काही खाऊ नये. मात्र, काही व्यक्तींना या काळात खाण्याची मुभा मिळू शकते. ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी ग्रहण काळात कोणत्या व्यक्तींनी काय खावे आणि काय खाऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 मे : 2023 वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुक्रवार, 5 मे 2023 रोजी रात्री 8:45 वाजता सुरू होईल आणि उशीरा पहाटे 1:00 वाजता संपेल. हे चंद्रग्रहण उपच्छाया चंद्रग्रहण असेल. या दिवशी वैशाख पौर्णिमा देखील आहे. ज्याला आपण सर्वजण बुद्ध पौर्णिमा या नावाने ओळखतो. चंद्रग्रहणाची परमग्रास वेळ रात्री 10:53 आहे. चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी 9 तास आधी सुरू होतो, परंतु वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सूतक कालावधी येथे वैध राहणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या घटनेचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही आहे. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळात कोणत्याही अन्नपदार्थाचे सेवन करू नये. यावेळचं चंद्रग्रहण रात्री पावणे नऊच्या सुमारास सुरू होणार असल्यानं शक्यतो त्या आधीच खाऊन घ्यावं. ग्रहणादरम्यान साधारणपणे कोणीही काही खाऊ नये. मात्र, काही व्यक्तींना या काळात खाण्याची मुभा मिळू शकते. ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी ग्रहण काळात कोणत्या व्यक्तींनी काय खावे आणि काय खाऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ग्रहण काळात कोणती व्यक्ती काय खाऊ शकते? सामान्यपणे ग्रहण काळात अन्न घेणे निषिद्ध आहे. पण गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती काही गोष्टी गरजेनुसार खाऊ शकतात. कारण वृद्धांना वयानुसार औषधांची गरज असते. तसेच गर्भवती महिलांना वेळोवेळी अन्न आणि पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पोटात वाढणाऱ्या बाळाला पोषणाची गरज असते, त्यामुळे गर्भवती महिलांना जास्त काळ उपाशी राहू नये असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे लहान मुले जास्त काळ उपाशी राहू शकत नाहीत. त्यांना अन्न खाण्यासही मनाई केली जाऊ शकत नाही. मात्र या काळात पदार्थांमध्ये तुळशीची पाने जरूर टाकावीत.

News18लोकमत
News18लोकमत

ग्रहण काळात काय खाऊ नये धार्मिक शास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार ग्रहण काळात शिजवलेले अन्न आणि कापलेली फळं खाणे टाळावे. या दरम्यान शिजवलेले अन्न आणि कापलेली फळे खाल्ल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. राशीला शनिची साडेसाती असली तरी नाही होणार त्रास; शनि जयंतीला न चुकता करा हे उपाय ग्रहण काळात काय खावे वृद्ध, लहान मुले आणि गरोदर महिलांनी ग्रहण काळात दूध प्यायला हरकत नाही. या दुधात तुळशीची पाने टाकून उकळवा आणि मगच घ्या. याशिवाय ग्रहणकाळात नारळ, केळी, डाळिंब आणि आंबा खाऊ शकतो. तसेच ड्रायफ्रुट्सही खाऊ शकतो. त्यामध्ये भरपूर ऊर्जा असते, जी गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आणि आवश्यक असते. Vastu: सुखी कुंटुबाची येईल प्रचिती! या वास्तु उपायांनी कुटुंब राहतं हसतं-खेळतं (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात