जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण उद्या, भारतात सर्वप्रथम या शहरांमध्ये दिसणार ग्रहण

या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण उद्या, भारतात सर्वप्रथम या शहरांमध्ये दिसणार ग्रहण

चंद्रग्रहण

चंद्रग्रहण

वर्षातील शेवटचं चंद्रहण हे मेष आणि भरणी नक्षत्रात होत आहे. हे ग्रहण दुपारी 1.32 पासून होणार असलं तरी भारतात ते सायंकाळी 5.20 वाजता दिसण्यास सुरुवात होईल आणि 6.20 वाजता संपेल.

  • -MIN READ Trending Desk Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : ज्योतिषशास्त्रात नवग्रहांना विशेष महत्त्व आहे. ग्रहांच्या प्रत्येक हालचाली आणि स्थितीचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो, अशी मान्यता आहे. चंद्रग्रहण आणि सूर्य ग्रहणाला तर ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचं स्थान आहे. ग्रहणाच्या स्थितीचा अभ्यास करून त्याचे चांगले वाईट परिणाम लक्षात घेतले जातात. त्यानुसार, या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण येत्या मंगळवारी (8 नोव्हेंबर 2022) होणार आहे. भारतात सर्वप्रथम हे चंद्रग्रहण अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये दिसणार आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. मंगळवारी होणारं चंद्रग्रहण हे 2022 या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण आहे. ते भारतातही दिसणार आहे. भारताच्या पूर्वेकडील शहरांमध्ये चंद्रोदयानंतरच हे ग्रहण दिसणार असून, इटानगरमध्ये ते सर्वप्रथम दिसेल. दरम्यान, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्यानं धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणाच्या सुतक काळातील नियमही लागू असतील. चंद्रग्रहणाचं सुतक 9 तास आधी सुरू होतं. कुठे दिसणार संपूर्ण चंद्रग्रहण? वर्षातील शेवटचं चंद्रहण हे मेष आणि भरणी नक्षत्रात होत आहे. हे ग्रहण दुपारी 1.32 पासून होणार असलं तरी भारतात ते सायंकाळी 5.20 वाजता दिसण्यास सुरुवात होईल आणि 6.20 वाजता संपेल. ग्रहणाचं सुतक 8 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9:21 वाजता सुरू होईल. संपूर्ण चंद्रग्रहण ईशान्य युरोप, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागर, या भागांत दिसणार आहे. भारतात, संपूर्ण ग्रहण फक्त पूर्वेकडील भागांमध्ये दिसेल, कोलकाता, पाटणा, सिलिगुडी, इटानगर, रांची आणि गुवाहाटी इथे संपूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे. तर आंशिक ग्रहण भारताच्या बहुतांश भागांत दिसेल. हे वाचा -  Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहणात काय खावं आणि काय खाऊ नये? काय आहेत नियम? ग्रहण काळात अशी घ्या काळजी चंद्रदर्शनानुसार प्रत्यक्ष ग्रहणाचा काळ सायंकाळी 5.20 ते सायंकाळी 6.20 पर्यंत आहे. या काळात अन्न पदार्थ्यांचं सेवन करणं टाळा. पूजा करू नका. गर्भवती महिलांनी सावधगिरी बाळगावी. देवाच्या मूर्तींना हात लावू नका. ग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर शक्य असल्यास स्नान करा किंवा हातपाय धुवा. चंद्रग्रहणात अशुभ परिणाम मिळू नयेत, यासाठी ग्रहण काळात शिवमंत्राचा जप करा. तसंच तुम्ही चंद्रमंत्राचासुद्धा जप करू शकता. यामुळे मंत्र सिद्ध होईल, आणि तो अधिक प्रभावीही होईल. ग्रहणानंतर पांढऱ्या वस्तू दान करा. तांदूळ, साखर, दूध, नारळ किंवा चांदीच्या वस्तू दान करणे शुभ ठरेल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ग्रहण झाल्यानंतर हे करा चंद्रग्रहणानंतर घरातील देवपूजेच्या जागेची स्वच्छता करावी. पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडावं. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. यानंतर तुमचे गुरु किंवा भगवान शिवाची पूजा करा. त्यानंतर एखाद्या गरीब व्यक्तीला पांढरी वस्तू दान करा. दरम्यान, मंगळवारी होणारं चंद्रग्रहण हे या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. भारतातील बहुतांश भागात ते दिसणार असल्यामुळे ते महत्त्वपूर्ण आहे. हे वाचा - Chandra Grahan 2022 : हे आहे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, या 4 राशीच्या लोकांनी राहावे खूप सावध (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात