जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / चंद्रग्रहणानंतर या अक्षराने नाव सुरू होणाऱ्यांच्या वाढतील अडचणी, एक उपाय करेल ठीक

चंद्रग्रहणानंतर या अक्षराने नाव सुरू होणाऱ्यांच्या वाढतील अडचणी, एक उपाय करेल ठीक

चंद्रग्रहणाचा राशीवर परिणाम

चंद्रग्रहणाचा राशीवर परिणाम

तज्ज्ञ पंडित मनोत्पल झा सांगतात की, चंद्रग्रहणाचे लोकांवर काही वाईट परिणाम होतील. विशेषत: कर्क राशीच्या लोकांना त्रास होईल. पंडित मनोत्पल यांनी कर्क राशीच्या लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 मे : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण काल रात्री पावणे नऊ ते एक वाजेपर्यंत लागले होते. ग्रहण भारतात फारसं दिसलं नाही, त्यामुळे त्याचा सूतक कालावधीही वैध नव्हता. पण, सर्वसाधारण ग्रहणकाळात काही नियम सांगितले जातात, काही नियम ग्रहण संपल्यानंतरही पाळले जातात. कोणतंही ग्रहण संपल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. चंद्रग्रहणाचा राशींवर चांगला-वाईट परिणाम होतो. चंद्रग्रहणाचा खराब प्रभाव कोणत्या राशीवर पडेल याची माहिती ज्योतिषाचार्य यांनी दिली आहे. तज्ज्ञ पंडित मनोत्पल झा सांगतात की, चंद्रग्रहणाचे लोकांवर काही वाईट परिणाम होतील. विशेषत: कर्क राशीच्या लोकांना त्रास होईल. पंडित मनोत्पल यांनी कर्क राशीच्या लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, हे चंद्रग्रहण भारतात दिसलं नसलं तरी त्याचे परिणाम राशीचक्रावर होतील. चंद्रग्रहणाचा सर्वाधिक परिणाम कर्क राशीवर चंद्रग्रहणानंतर घरामध्ये गंगाजल शिंपडावे, असे त्यांनी सांगितले. चंद्रग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये. पंडित मनोत्पल झा सांगतात की, या चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम कर्क राशीच्या लोकांवर सर्वात जास्त होण्याची शक्यता आहे. कारण कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. ग्रहणात चंद्र दूषित झाला असल्यानं कर्क राशीच्या लोकांवर त्याचा परिणाम होईल. कारण जर राशीचा स्वामी दूषित झाला असेल तर त्या राशीच्या लोकांना सर्वात जास्त फटका बसतो, असे मानले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

ज्या कर्क राशीच्या लोकांची नावे He, Hu, He, Ho, Da, Dee, Do, De, Do ने सुरू होतात, त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. घरच्या तुळशीला मंजिरी आल्या असतील तर या गोष्टी करून घ्या; होईल लक्ष्मीची कृपा कर्क राशीच्या लोकांनी काय उपाय करावेत - ते म्हणाले की, ग्रहणानंतर कर्क राशीच्या लोकांनी सकाळी लवकर उठून भगवान भोलेनाथाची पूजा करावी. तुमच्यासाठी सर्व काही चांगले होईल. ते म्हणाले की, कोणताही पंडित-मौलवी नशीब बदलू शकत नाही. तुम्ही तुमच्या कर्मानुसार तुमचे नशीब बदलू शकता. इतर राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण सामान्य आहे, त्यांनी अजिबात काळजी न करता नित्य कामं प्रामाणिकपणे करत राहावे.. अशी स्वप्नं पडणं शुभ संकेत असतात! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभ होण्याचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात