मुंबई, 11 मार्च : पती पत्नीच्या नात्याबद्दल अनेकदा बोललं जातं. कुटुंब व्यवस्थेतील हे महत्त्वाचं नातं आहे. हे नाजूक नातं टिकवायचं कसं यावर सल्लेही अनेकजण देतात. सध्याच्या तणावपूर्ण युगात तर हे नातं टिकवायचं कसं यावर समुपदेशकांपासून ते मानसोपचार तज्ज्ञांपर्यंत अनेकजण माहिती देतात. आपल्या देशात राजकीय, सामाजिक, संरक्षण, सरकार, अर्थव्यवस्था अशा अनेक क्षेत्रांत मार्गदर्शक ठरणाऱ्या चाणक्य नीतीमध्येही पती-पत्नीचं नातं कसं टिकवायचं याबद्दल सांगितलं गेलं आहे.
पती-पत्नीच्या नात्याबद्दल गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे. हे नातं बिघडलं किंवा त्यात जर दुरावा आला तर त्याचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर होतो. या नात्यात दुरावा येऊ देऊ नये. हे नातं कमकुवत झालं तर कधीही भरून न निघणारं नुकसान होतं. तुमचा सहचारी हा तुमचा आयुष्यभराचा सोबती असतो. कितीही कठीण काळ आला तरी तुमची पत्नी, पती तुम्हाला सोडून जात नाही. त्यामुळेच हे नातं आयुष्यभर निभवायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
भारतातील श्रेष्ठ विद्वानांमध्ये चाणक्यचं स्थान फार वरचं आहे. काही गोष्टींकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर पती पत्नीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, असं चाणक्यचं म्हणणं आहे. जाणून घेऊयात या गोष्टी ज्या तुमच्या नाजूक पण आयुष्यभर साथ निभावणाऱ्या नात्याला वाचवू शकतात.
अहंकार- अंहकारामुळे पती पत्नीचं नातं कमकुवत होऊ शकतं, असं चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे अहंकारापासून दूर राहण्याचा प्रयत्न दोघांनीही केला पाहिजे. या नात्यात अंहकाराला स्थानच नसावं. ज्ञान आणि नम्रता यामुळे अहंकार नष्ट होतो आणि हे नातं उद्ध्वस्त होण्यापासून वाचतं.
संशय - पती पत्नीच्या नात्यात संशयाला अजिबात जागा नसावी. या नात्यात संशय निर्माण झाला तर मग मात्र हे नातं पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं. नवरा-बायकोच्या नात्यात गैरसमज, संशयाला अजिबात थारा नसावा. जर या नात्यात संशय निर्माण झाला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतात. नात्यात संवाद नसल्यासही संशय निर्माण होतो. तो निर्माण होऊ नये याची पूर्ण काळजी घ्या.
हे वाचा - ओठांच्या आकारावरून ओळखू शकता समोरच्याचं व्यक्तिमत्त्व आणि बरंच काही..
परस्परांबद्दल आदर सन्मानाची कमतरता - पती आणि पत्नीच्या नात्यात परस्परांबद्दल आदर आणि सन्मान असणं अत्यंत आवश्यक आहे. दोन्हीपैकी कोणा एकाकडूनही जर आदर, सन्मान कमी झाला तर मग अनेक समस्या निर्माण होतात. या नात्यात दोघांचाही मान राखलं जाणं आवश्यक आहे. दोघांचाही एकाच पातळीवर आदर राखला गेला पाहिजे. त्यामुळेच या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
हे वाचा - नववधूला का घातली जातात चांदीची जोडवी? असं आहे त्याचं धार्मिक-वैज्ञानिक महत्त्व
असत्य-खोटं बोलणं - या नात्यात कुणीच खोटं बोलू नये असं चाणक्य नीती सांगते. खोटं बोलायला सुरुवात झाली की नात्यात दुरावा यायला लागतो, अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळेच खोट्याचा आसरा या नात्यात कधीच घेऊ नये. एकूणच पती पत्नीचं नातं हे विश्वास, प्रेम, परस्परांबद्दलचा आदर यावर अवलंबून असतं. हे नातं टिकवणं जितकं सोपं आहे तितकंच अवघड आहे. प्रामाणिकपणा, एकमेकांबद्दलचा आदर, खरेपणा या आधारावर हे नातं दीर्घकाळ टिकतं आणि तुमचं आयुष्यही फुलवतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chanakya niti, Marriage, Religion