जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / नववधूला का घातली जातात चांदीची जोडवी? असं आहे त्याचं धार्मिक-वैज्ञानिक महत्त्व

नववधूला का घातली जातात चांदीची जोडवी? असं आहे त्याचं धार्मिक-वैज्ञानिक महत्त्व

पायात जोडवी घालण्याची प्रथा

पायात जोडवी घालण्याची प्रथा

लग्नातल्या सप्तपदीदरम्यान एक महत्त्वाचा विधी केला जातो. त्यामध्ये नववधूच्या पायाच्या एका बोटामध्ये जोडवी (Toe Rings) घातली जातात. अंगठीसारखी दिसणारी ही जोडवी वधूच्या पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटामध्ये घातली जातात.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

मुंबई, 10 मार्च : भारतात वेगवेगळ्या धर्मांचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे नागरिक राहतात. या वेगवेगळ्या धर्मांच्या काही रूढी आणि परंपरा (Norms And Traditions) असतात. प्रत्येक धर्माचे नागरिक त्या पाळण्याचा प्रयत्न करत असतात. या रूढी आणि परंपरा प्रत्येक पिढी जोपासत असते. हिंदू धर्मामध्ये लग्न हा अतिशय पवित्र आणि आनंददायी सोहळा मानला जातो. प्रत्येकजण आपापल्या परीने हा लग्नाचा सोहळा साजरा करत असतो. लग्नाचा हा सोहळा अनेक रूढी आणि परंपरा जोपासत साजरा केला जातो. लग्नात अनेक विधी केले जातात. असं मानलं जातं, की या विधींमुळे भावी दाम्पत्याचं आयुष्य सुखाने आणि समृद्धीने भरून जातं. लग्नातल्या सप्तपदीदरम्यान एक महत्त्वाचा विधी केला जातो. त्यामध्ये नववधूच्या पायाच्या एका बोटामध्ये जोडवी (Toe Rings) घातली जातात. अंगठीसारखी दिसणारी ही जोडवी वधूच्या पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटामध्ये घातले जातात. हिंदू महिला आयुष्यभर ही जोडवी आपल्या पायाच्या बोटांमध्ये परिधान करतात. यामागे धार्मिक कारण तर आहेच. परंतु वैज्ञानिक कारणही (Scientific Reason) आहे. महिलांच्या पायात असणाऱ्या जोडव्यांमागे कोणती धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत, हे जाणून घेऊ या. जोडवी घालण्यामागचं धार्मिक कारण रामायण काळाशी संबंधित आहे. असं मानलं जातं, की जेव्हा रावणाने सीतामातेचं अपहरण केलं होतं, तेव्हा त्यांनी प्रभू रामचंद्रांसाठी खूण म्हणून जोडवी मागे सोडली होती. त्यामुळे जोडवी घालणं अतिशय शुभ मानलं जातं. जोडवी हा महिलेला आपल्या पतीशी जोडून ठेवणारा दुवा असतो. त्यामुळे ते कायम एकत्र राहतात असं मानलं जातं. जोडवी घालण्यामागे एक अतिशय महत्त्वाचं असं वैज्ञानिक कारणदेखील आहे. जोडवी पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटांमध्येच घातली जातात. ती अ‍ॅक्युप्रेशरचं (Acupressure) काम करतात. या बोटांच्या नर्व्ह्ज महिलेच्या हृदयाशी आणि गर्भाशयाशी जोडलेल्या असतात. जोडवी घातल्यामुळे या बोटाच्या नर्व्ह्जवर दाब पडतो. त्यामुळे या नसांमधलं ब्लड सर्क्युलेशन अर्थात रक्ताभिसरण सुरळीत राहतं. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. महिलेला अनियमित पाळीची समस्या असली, तर त्यासाठीदेखील जोडवी घालणं उपयुक्त ठरू शकतं. एकूणच जोडवी घालणं हे शरीरासाठी उपयुक्त मानलं जातं.

News18लोकमत
News18लोकमत

जोडवी चांदीपासून (Silver Metal) बनवलेली असतात. यामागेही धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. सोनं हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळे कमरेखाली सोन्याचे दागिने घातल्यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो, असं मानलं जातं. चांदी हा धातू ऊर्जेचा उत्तम वाहक असतो. चांदी जमिनीतली पोलर ऊर्जा आपल्या शरीरापर्यंत पोहोचवते. च्यामुळे शरीरामध्ये या ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे महिलांना प्रसन्न वाटतं आणि त्यांच्यातली नकारात्मकता कमी होऊ शकतेते. जोडव्यांमुळे विवाहित महिलांच्या सौंदर्यातही भर पडते. त्यामुळे पाय अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतात. हे वाचा -  लक्ष्मीची पाऊले अशा घराकडे आपोआप वळतात, आचार्य चाणक्यांनी सांगितलेत 3 उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात