मुंबई, 17 मे : वैशाख महिन्यातील बुध प्रदोष व्रत आज 17 मे, बुधवारी आहे, शिवाय आज मासिक शिवरात्रीदेखील आहे. आजचा बुद्ध प्रदोष व्रत आयुष्मान योग आणि सौभाग्य योगामध्ये आहे. हे दोन्ही योग पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात. आज स्वर्ग भद्रा रात्री असून पंचक सकाळी 7.38 पर्यंत संपत आहे. पंचक आणि भद्र हे दोन्ही शिवपूजेच्या मुहूर्ताच्या आधी किंवा नंतरचे आहेत. सायंकाळी प्रदोष व्रताची पूजा करायची असते. या व्रताचे पालन केल्याने आणि शिव-शंकराच्या कृपेनं माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांनी बुद्ध प्रदोष व्रत आणि उपासनेची पद्धत, पूजा साहित्य, मंत्र इत्यादींची माहिती दिली आहे. बुध प्रदोष व्रत 2023 शुभ मुहूर्त वैशाख कृष्ण त्रयोदशी तारीख : 16 मे, मंगळवार, रात्री 11.36 पासून वैशाख कृष्ण त्रयोदशी तिथी समाप्त: 17 मे, बुधवार, रात्री 10.28 वाजता आयुष्मान योग: आज, सकाळपासून रात्री 09.18 मिनिटे सौभाग्य योग: आज, रात्री 09.18 ते उद्या सकाळपर्यंत बुध प्रदोष पूजा मुहूर्त: आज, संध्याकाळी 07.06 ते 09.10 पर्यंत शुभ उत्तम मुहूर्त: आज, रात्री 08.24 ते रात्री 09.10 पर्यंत बुध प्रदोष व्रत 2023 अशुभ मुहूर्त - पंचक: आज, सकाळी 05:29 ते 07:39 पर्यंत भद्र : आज, रात्री 10.28 ते उद्या सकाळी 05.29 मिनिटे राहुकाल : आज, दुपारी 12.35 ते 02.15 पर्यंत
बुध प्रदोष व्रत आणि उपासना पद्धत - ज्यांना आज प्रदोष व्रत पाळायचे आहे त्यांनी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला पाण्याने अर्घ्य अर्पण करावे. नंतर हातात पाणी व फुले घेऊन प्रदोष व्रत व शिवपूजनाचा संकल्प करावा. दिवसभरात नित्य पूजा करावी. दिवसभर फळांच्या आहारावर रहावे. भगवान भोलेनाथाच्या भक्तीमध्ये वेळ घालवा. दिवसा शक्यतो झोपू नये. संध्याकाळी कोणत्याही शुभ मुहूर्तावर कोणत्याही शिवमंदिरात जाऊन पूजा करावी किंवा घरी पूजा करावी. सर्व प्रथम भगवान शिवाला गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर गाईच्या दुधाने अभिषेक करावा. चंदनाचा टिळा लावावा. भोलेनाथांना अक्षत, फुले, धूप, दिवा, गंध, मध, बेलपत्र, भांग, धतुरा, मदार फुले, फळे, मिठाई इत्यादी अर्पण करा. या दरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहा. घरात पितृदोष असल्यास वेळ नका घालवू; अशुभ घडण्यापूर्वी हे उपाय करून घ्या यानंतर शिव चालिसाचे पठण करावे. बुध प्रदोष व्रताची कथा ऐका. त्यानंतर नियमानुसार शंकराची आरती करावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना करा. त्यानंतर रात्री जागर करू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून ध्यान करून पूजा करावी. त्यानंतर दान करावे, त्यानंतर सूर्योदयानंतर भोजन करून व्रत पूर्ण करावे. अशी स्वप्नं पडणं शुभ संकेत असतात! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभ होण्याचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)