मराठी बातम्या /बातम्या /religion /आज भौमवती अमावस्या; पितृदोष घालवण्यासाठी शुभ दिवस, पूजा-मुहूर्त जाणून घ्या

आज भौमवती अमावस्या; पितृदोष घालवण्यासाठी शुभ दिवस, पूजा-मुहूर्त जाणून घ्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आज सकाळी पवित्र नद्यांमध्ये स्नान करा किंवा घरात गंगाजल पाण्यात घालून स्नान करा. त्यानंतर पितरांना पाण्याने तर्पण अर्पण करावे. त्यानंतर सूर्यदेवाला जल, लाल फुले, लाल चंदन अर्पण करावे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 मार्च : आज मंगळवार, 21 मार्चला भौमवती अमावस्या आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येमुळे फाल्गुन महिना संपून चैत्र महिना सुरू होणार आहे. मंगळवारच्या अमावस्येला भौमवती अमावस्या म्हणतात. या दिवशी स्नान-दान केल्यानं पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. भौमवती अमावस्येला हनुमानाची पूजा केली जाते आणि पृथ्वीपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगल देवाचीही पूजा केली जाते. भौमवती अमावस्येला पंचक असून सर्वार्थ सिद्धी योगही तयार झाला आहे. काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांच्याकडून भौमवती अमावस्येचा शुभ मुहूर्त, स्नान-दान आणि उपासना पद्धतीची माहिती जाणून घेऊ.

भौमवती अमावस्या 2023 मुहूर्त -

चैत्र अमावस्या तिथीची सुरुवात: आज, मंगळवार, पहाटे 01:47 वाजता

चैत्र अमावस्या तिथी समाप्त: उद्या, बुधवार, पहाटे 01:52 वाजता

सर्वार्थ सिद्धी योग: आज, संध्याकाळी 05:25 ते उद्या सकाळी 06:23 पर्यंत.

शुभ योग : आज सकाळ ते दुपारी 12.42 पर्यंत

शुक्ल योग : आज दुपारी 12.12 पासून

आंघोळीची वेळ: सकाळी 04:49 ते 05:37, अगदी सूर्योदयानंतर 06:24

आजची शुभ वेळ: दुपारी 12:04 ते दुपारी 12:53 पर्यंत

पंचक : दिवसभर

भौमवती अमावस्या 2023 स्नान-दान आणि पूजा पद्धत

आज सकाळी पवित्र नद्यांमध्ये स्नान करा किंवा घरात गंगाजल पाण्यात घालून स्नान करा. त्यानंतर पितरांना पाण्याने तर्पण अर्पण करावे. त्यानंतर सूर्यदेवाला जल, लाल फुले, लाल चंदन अर्पण करावे. यानंतर तुम्ही अन्न, वस्त्र, फळे, मिठाई इत्यादी दान करा. जर तुम्हाला कुंडलीतील मंगळ बळकट करायचा असेल तर तुम्ही लाल फुले, लाल वस्त्र, डाळ इत्यादी दान करू शकता.

ही अमावस्या मंगळवारी आली आहे. यासाठी भौमवती अमावस्येला हनुमानाची आणि मंगल देवीची पूजा करावी. हनुमानाला सिंदूर, अक्षता, फुले, हार, धूप, दिवा, मोतीचूर लाडू अर्पण करा. त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे. हनुमान मंत्रांचाही जप करू शकता. त्यानंतर मंगळाच्या बीज मंत्राचा जप करावा.

अमावास्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावावा. याने तुम्हाला पितर, देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील. आज पंचक आहे, परंतु यामध्ये तुम्ही पूजा, स्नान, दान इत्यादी करू शकता.

हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Amavasya, Religion