जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / तुमच्या मुलाचं अभ्यासात नाही लागत लक्ष? ‘हे’ रत्न घातले तर होईल फायदा

तुमच्या मुलाचं अभ्यासात नाही लागत लक्ष? ‘हे’ रत्न घातले तर होईल फायदा

विद्यार्थ्यांसाठी 'हे' रत्न फायदेशीर आहे.

विद्यार्थ्यांसाठी 'हे' रत्न फायदेशीर आहे.

तुमच्या मुलाचं अभ्यासात लक्ष लागत नसेल तर चित्त स्थिर राहण्यासाठी ‘या’ रत्नाचा फायदा होऊ शकतो.

  • -MIN READ Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
  • Last Updated :

डोंबिवली, 28 जुलै :  रत्न आणि ज्योतिष शास्त्र यांचा जवळचा संबंध आहे. योग्य प्रकारचे रत्न घातली तर त्याचा फायदा होतो, असं ज्योतिषी सांगतात. राशीनुसार तसंच वेगवेगळ्या कारणांसाठी एखादं रत्न घालावं असा त्यांचा सल्ला असतो. या रत्नांची निवड ही योग्य प्रकारे करणे आवश्यक असते. विद्यार्थी आयुष्यात कोणते रत्न घालावे याबाबतचा सल्ला डोंबिवलीचे ज्योतिषी मुकुंद जोशी यांनी दिला आहे. आयुष्याचा पाया रचला जातो त्या विद्यार्थी दशेत मोती हे रत्न घालावे, अशी सूचना जोशी यांनी केली आहे. मोती रत्न हे चंद्राचं प्रतिक मानलं जातं. शीतलता हा त्याचा मूळ स्वभाव आहे. ती परिधान केल्याने मनाला शांती मिळते. कर्क राशीच्या व्यक्तींने मोती घातल्याने स्थिरता येते. तर विद्यार्थी दशेतील सर्वांनीच मोती घालावा असा सल्ला त्यांनी दिला.

News18लोकमत
News18लोकमत

विद्यार्थ्यांना काय फायदा? ‘विद्यार्थ्यांनी मोती परिधान केल्याने त्याचे चित्त स्थिर राहते. त्यांना वाईट संगत लागत नाही. विद्यार्थीदशेत  हा ग्रह परिधान करावा तो कोणत्याही विद्यार्थ्याला चालतो. विद्यार्थीदशा संपल्यानंतर आपल्याला सांगितले असतील ते ग्रह परिधान करावे असे जोशी सांगतात. ज्यांचे मानसिक संतुलन कमी जास्त होत असते अशा व्यक्तींनी मोती वापरला तर तो त्यांना शुभदायक फळ देतो. चित्त स्थिर राहते,’ असे जोशी यांनी सांगितले. मोती हा शिंपल्यातून तयार होत असून एखादा कण शिंपल्यात गेला की शिंपल्यातील जीव आपल्या भोवती एक आवरण तयार करतो. हे आवरण कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असते. हे आवरण साचून आतमध्ये एक गोळी तयार होते. या कडक गोळीलाच मोती असे संबोधले जाते. मोती बनवण्यासाठी खास शेतीही केली जाते. मोती हे रत्न अंत्यत दुर्मिळ असून नैसर्गिक मोती रंगाने पांढरा किंवा हलकासा गुलाबी असतो. कोणत्या राशीला आहे पुष्कराजचा फायदा? ‘या’ राशीनं चुकूनही वापरु नये रत्न! मोती कसा ओळखावा? मोती एका फरशीच्या तुकडयावर खडूसारखे घासले तर खडूसारखीच पांढरट पूड निघते. त्यानंतरही मोत्याला चरे न पडता तो तसाच चमकदार आणि गुळगुळीत रहातो अशी समजूत आहे. नकली मोत्यांवर हा प्रयोग केल्यास त्यांना चरे पडतात आणि वरचे प्लास्टिक निघून आतली काच दिसते असे जोशी यांनी सांगितले.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात