मुंबई, 27 डिसेंबर : हिंदू धर्मात गायत्रीमातेचं स्थान महत्त्वपूर्ण आहे. गायत्रीमातेला वेदांची माता मानलं जातं. गायत्री मंत्र हे चारही वेदांचं सार आहे असं मानलं जातं. त्यामुळेच हिंदू धर्मात गायत्री मंत्राला खूप महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. वेद-पुराणांमध्ये गायत्री मंत्राचा विशेषत्वाने आणि विस्ताराने उल्लेख करण्यात आला आहे. ज्या घरात किंवा ज्या ठिकाणी गायत्री मंत्राचा जप केला जातो, त्या ठिकाणच्या सगळ्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि ती जागा शुद्ध व पवित्र होते. मध्य प्रदेशातल्या भोपाळमधले ज्योतिषी आणि वास्तुसल्लाकार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी गायत्री मंत्राच्या जपामुळे होणाऱ्या उपयोगांबद्दल माहिती सांगितली आहे. ती जाणून घेऊ या. गायत्री मंत्र ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्। गायत्री मंत्राचा अर्थ त्या सर्वरक्षक, प्राणांहून प्रिय, दुःखनाशक, सुखस्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देवस्वरूप परमात्म्याला आपण अंतःकरणात धारण करू या. तो परमात्मा आमच्या बुद्धीला सन्मार्गासाठी प्रेरित करू दे. हेही वाचा - जीवनातली प्रत्येक समस्या दूर करू शकतो गायत्री मंत्र विद्यार्थ्यांसाठी लाभदायक विद्यार्थिवर्गासाठी गायत्री मंत्र खूप लाभदायक मानला गेला आहे. कोणी विद्यार्थी दररोज या मंत्राचा 108 वेळा जप करत असेल, तर त्याला कोणत्याही प्रकारची विद्या प्राप्त करण्यात कोणतीही समस्या येत नाही. असंही मानलं जातं, की गायत्री मंत्राच्या जपामुळे व्यक्तीचं तेज वाढतं. डोळ्यांचं तेज वाढतं, क्रोध शांत होतो आणि ज्ञानाची प्राप्ती होते. व्यापार किंवा नोकरीत प्रगतीसाठी एखाद्या व्यक्तीला व्यापारात किंवा नोकरीत अपयश मिळत असेल किंवा प्रगतीत वारंवार अडथळे येत असतील, तर अशा व्यक्तीने दररोज गायत्री मंत्राचा जप करावा. गायत्री मंत्राचा जप केल्याने अशा व्यक्तींना नक्कीच लाभ मिळू शकतो. अपत्यप्राप्तीसाठी एखाद्या दाम्पत्याला बरीच इच्छा असूनही अपत्यप्राप्ती होत नसेल किंवा त्यात काही अडचणी असतील, तर अशा वेळी पती-पत्नी दोघांनीही मिळून एक महिनाभर दररोज सूर्योदयापूर्वी 1100 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. जप करताना अपत्यप्राप्तीची इच्छा मनात असावी. असं केल्याने या दाम्पत्याला लवकर अपत्य होण्यास मदत होऊ शकेल. गायत्री मंत्राच्या जपामुळे एवढे लाभ होत असल्याने गायत्री मंत्राला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचं आणि आदराचं स्थान प्राप्त झालं आहे. कोणीही जप करण्यापूर्वी आपले गुरुजी किंवा या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊन मगच जप करण्यास सुरुवात करणं अधिक श्रेयस्कर ठरतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







