मराठी बातम्या /बातम्या /religion /

हातउसने असो कि बँकेतून, कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ; फेडताना नाकीनऊ येऊ शकतं

हातउसने असो कि बँकेतून, कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ; फेडताना नाकीनऊ येऊ शकतं

कर्ज-घेणे देणे शुभ दिवस

कर्ज-घेणे देणे शुभ दिवस

अनेकांना कर्ज वेळेवर फेडता येत नाही. कर्ज घेण्यासाठी किंवा परतफेड करण्यासाठी योग्य वेळ न निवडणे, हे त्याचे शास्त्रात कारण मानले गेले आहे. ज्यामुळे इच्छा असूनही कर्जाची परतफेड होत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 02 डिसेंबर : मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि घराच्या बांधकामासाठी कर्ज घेणं ही सर्वसामान्य बाब आहे. परंतु, अनेकांना कर्ज वेळेवर फेडता येत नाही. कर्ज घेण्यासाठी किंवा परतफेड करण्यासाठी योग्य वेळ न निवडणे, हे त्याचे शास्त्रात कारण मानले गेले आहे. ज्यामुळे इच्छा असूनही कर्जाची परतफेड होत नाही. अशा परिस्थितीत कर्ज घेताना आणि त्याची परतफेड करताना ग्रह-नक्षत्रांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला ज्योतिष शास्त्रानुसार कर्ज घेणे आणि देण्याशी संबंधित शुभ आणि अशुभ काळ सांगणार आहोत.

कर्ज कधी घेऊ नये -

पंडित रामचंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार काही वार आणि नक्षत्रांचा काळ कर्ज घेण्यासाठी अशुभ मानला जातो. यामध्ये मंगळवार, बुधवार आणि शनिवार या दिवसांचा समावेश आहे. हस्त, मूल, आद्रा, ज्येष्ठ, विशाखा, कृतिका, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाद, उत्तराभाद्रपद, रोहिणी इत्यादी नक्षत्रांवर कर्ज देण्या-घेण्याचे व्यवहार करू नयेत. रविवारी कर्ज घेणे आणि देणे देखील शुभ नसतं. या दिवसात आणि नक्षत्रांमध्ये घेतलेले कर्ज फेडताना अनंत अडचणी येतात. त्यामुळे व्यक्तीवर कर्जाचा बोजा वाढतच जातो.

कर्ज घेण्यासाठी शुभ काळ -

पंडित जोशी यांच्या मते सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार हे कर्ज घेण्यासाठी शुभ दिवस मानले जातात. दुसरीकडे नक्षत्रांबद्दल बोलायचे तर स्वाती, धनिष्ठ, शतभिषा, पुनर्वसु, चित्रा, अनुराधा, अश्विनी, मृगाशिरा, रेवती आणि पुष्य या नक्षत्रांमध्ये कर्ज घेणे शुभ मानले जाते. या दिवसात आणि नक्षत्रांमध्ये घेतलेले कर्ज वेळेवर फेडण्याची शक्यता चांगली असते, असे मानले जाते.

कर्ज परतफेड वेळ -

कर्ज फेडण्यासाठी मंगळवार आणि बुधवार शुभ मानले जातात. वृद्धी योग आणि हस्ती नक्षत्रात कर्जाची परतफेड करूनही तो व्यक्ती लवकर मुक्त होतो. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार कर्ज द्यायचे असेल तर बुधवार आणि गुरुवारी पुढे ढकलले पाहिजे. शुक्रवारी कर्ज घेणे आणि देणे हे दोन्ही फलदायी मानले जातात. बुधवार आणि गुरुवार हे बचत योजनांमध्ये पैसे जमा करण्यासाठी शुभ दिवस आहेत.

वाचा - 'चोर' ते 'रोग'.. पंचकाचे आहेत इतके प्रकार; अग्नी पंचकात का टाळावीत शुभ कार्ये?

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Home Loan, Loan, Money, Money laundering, Money matters, Religion