जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / कधी विचार केलाय? महादेवांच्या अवतारांच्या नावापुढे श्री का लावले जात नाही? इथे मिळेल उत्तर

कधी विचार केलाय? महादेवांच्या अवतारांच्या नावापुढे श्री का लावले जात नाही? इथे मिळेल उत्तर

भगवान विष्णूच्या पत्नी लक्ष्मीचे एक नाव श्री असेही आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 जानेवारी: आपण नेहमी पाहिले असेल की, महाबली हनुमंत वगळता भगवान महादेव आणि त्यांच्या इतर अवतारांच्या नावांपुढे श्री लावले जात नाही. श्रीराम, श्रीकृष्ण यांसारख्या भगवान विष्णूच्या अवतारांपुढे मात्र श्री लावलेले आहे. वास्तविक, भगवान विष्णूच्या पत्नी लक्ष्मीचे एक नाव श्री असेही आहे. त्रेतायुगात जेव्हा श्रीहरीने श्रीरामाचा अवतार घेतला तेव्हा लक्ष्मीजींनी सीतेचा अवतार घेतला. सीता माता रुद्रावतार हनुमानाला आपला पुत्र मानत होत्या. त्यांच्या आपुलकीमुळे मुलाच्या नावापुढे माता श्रीचे नाव लावले जाते. म्हणूनच हनुमानजींच्या स्तुतिपर रचनेला श्रीहनुमान चालिसा म्हणतात. श्रीचे असे आहे महत्त्व, परंपरा सामान्य लोकांशी संबंधित शास्त्रानुसार, श्री म्हणजे शोभा, लक्ष्मी आणि कांती. हे वेगवेगळ्या संदर्भात वापरले जाते. समाजात ज्येष्ठांना मानाचा नमस्कार करून श्री लावतात. धार्मिक ग्रंथांनुसार, विकास आणि शोध घेण्याची शक्ती असलेल्या व्यक्तीला श्रीयुक्त मानले जाते. म्हणजे जो प्रयत्नाने धन प्राप्त करतो तो सज्जन होतो. सर्व कामात श्री आहे. म्हणूनच ऋषी, महापुरुष, तत्त्वज्ञ आणि इतरांच्या नावांपुढे श्री जोडण्याची परंपरा आली.

News18लोकमत
News18लोकमत

मात्र, प्रभू रामाला श्रीराम म्हटल्यावर देवत्वाची जाणीव होते. श्री ही संपूर्ण विश्वाची प्राणशक्ती आहे, भगवंताने हे विश्व निर्माण केले कारण तो श्रींनी ओथंबलेला आहे. याशिवाय भगवान विष्णूंच्या पत्नी लक्ष्मीचे एक नाव श्री आहे. म्हणूनच भगवान विष्णूच्या अवतारांच्या नावासमोर देवी लक्ष्मीचे नाव जोडून ते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या एकतेचा संदेश देतात आणि ‘श्रीहरी’ म्हणत त्यांचा आदर करतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात