जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / घरातील तुळशीच्या मंजिरी बनवतील तुम्हाला धनवान; पैसा-संपत्तीत होईल भरपूर वाढ

घरातील तुळशीच्या मंजिरी बनवतील तुम्हाला धनवान; पैसा-संपत्तीत होईल भरपूर वाढ

तुळशीच्या मंजिरींचे फायदे

तुळशीच्या मंजिरींचे फायदे

तुळशीला येणाऱ्या मंजिरीही आपल्यासाठी फायदेशीर ठरतात, हे फार कमी लोकांना माहिती आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी तुळशीच्या मंजिरी कशा वापराव्या, याविषयी दिल्लीचे ज्योतिषी आचार्य आलोक पंड्या यांनी दिलेली माहिती पाहुया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 एप्रिल : हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पतींना अतिशय पवित्र मानलं जातं. तुळशीचं रोप यापैकी एक आहे. तुळशीच्या रोपाचे जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढेच त्याचे वैज्ञानिक महत्त्वही आहे. आयुर्वेदातही तुळशीचा वापर केला जातो. हिंदू धर्मात तुळशीची दररोज प्रत्येक घरात पूजा केली जाते आणि तिला जल अर्पण केले जाते. याशिवाय तुळशीची पाने अनेक प्रकारच्या रोगांवरही फायदेशीर आहेत. तसेच तुळशीला येणाऱ्या मंजिरीही आपल्यासाठी फायदेशीर ठरतात, हे फार कमी लोकांना माहिती आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी तुळशीच्या मंजिरी कशा वापराव्या, याविषयी दिल्लीचे ज्योतिषी आचार्य आलोक पंड्या यांनी दिलेली माहिती पाहुया. ज्योतिष शास्त्रानुसार, घरातील, अंगणातील तुळशीला मंजिरी येणं शुभ असतं. तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे, अशी धार्मिक मान्यता आहे, तुळशीचा उपयोग विशेषत: भगवान विष्णूच्या पूजेमध्ये केला जातो. विष्णू पूजेत तुळशीची पाने तसेच तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्यास अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. याशिवाय उत्पन्नातही वाढ होते, असे मानले जाते. आजच्या युगात सुखी जीवन जगण्यासाठी पैसा मिळावा, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. घरात पैसा-धन-धान्य भरपूर राहण्यासाठी तुळशीच्या काही मंजिरी लाल रंगाच्या कपड्यात बांधून घराच्या तिजोरीत ठेवा. असं केल्यानं लक्ष्मीची कृपा सदैव राहते, असे मानले जाते. हिंदू धर्मात गंगेचे पाणी तुळशीसारखे पवित्र मानले जाते. घराच्या उत्तर दिशेला गंगाजल आणि तुळशीच्या मंजिरी ठेवून हे पाणी रोज संपूर्ण घरात शिंपडले तर नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही आणि घराची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.

News18लोकमत
News18लोकमत

लक्ष्मी मातेची पूजा करताना पूजा साहित्यात तुळशीच्या मंजिरींचा समावेश करणे खूप शुभ मानले जाते. शुक्रवारी माता लक्ष्मीला तुळशीच्या मंजिरी अर्पण कराव्यात. असं केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा नेहमी राहते आणि घरात धनाचे आगमन वाढते, असे मानले जाते. हे वाचा -   सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची ‘अशी’ बैठक जुळायला लागते (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात