मुंबई, 22 जुलै : यंदा अधिक मासामुळे श्रावण महिन्यात दोन पौर्णिमा आहेत. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेचे व्रत पाळले जाते आणि स्नान-दान करण्याची परंपरा आहे. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करून कथा ऐकतात. त्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, असे मानले जाते. या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि पापांपासून मुक्ती मिळते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी श्रावण महिन्याची पौर्णिमा कधी आहे? स्नान आणि दानासाठी शुभ मुहूर्त कोणता? याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ. अधिक मास पौर्णिमा 2023 तारीख हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी श्रावण महिन्याचा शुक्ल पक्ष चालू आहे. मंगळवार 1 ऑगस्ट रोजी पहाटे 03.51 वाजल्यापासून अधिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा सुरू होईल. ही तिथी 1 ऑगस्टच्या रात्री 12:01 पर्यंत वैध आहे. त्यामुळे श्रावण अधिक मासची पौर्णिमा 1 ऑगस्ट रोजी आहे. अधिक मास पौर्णिमा 2023 स्नान-दान शुभ मुहूर्त - पौर्णिमेच्या दिवशी, लोक ब्रह्म मुहूर्तापासूनच स्नान आणि दान करण्यास सुरुवात करतात. श्रावण अधिक मास पौर्णिमेचा ब्रह्म मुहूर्त पहाटे 04:18 ते 05:00 पर्यंत आहे. यानंतर, सकाळी 09:05 ते दुपारी 02:09 हा चांगला काळ आहे.
अधिक मास पौर्णिमा 2023 चंद्रोदय - अधिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी 07:16 वाजता होईल. 2 शुभ योगात अधिक मास पौर्णिमा - अधिक मासाच्या पौर्णिमेला दोन शुभ योग तयार होत आहेत. मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी पहाटे 06.53 पर्यंत प्रीति योग आहे आणि त्यानंतर आयुष्मान योग सुरू होईल, जो दिवसभर आहे. त्या दिवशीचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:00 ते 12:54 पर्यंत आहे. श्रावण सुरू होताच राशीनुसार करा या गोष्टी; शंभू-महादेव अडचणींमध्ये दाखवतील मार्ग भद्रकाळ सकाळपासून दुपारपर्यंत - 1 ऑगस्ट रोजी भद्रकाळ सकाळी 05:42 पासून सुरू होईल आणि दुपारी 01:57 पर्यंत राहील. त्या दिवशीचा राहुकाल दुपारी 03.50 ते 05.31 पर्यंत आहे. पौर्णिमेला मंगळा-गौरी व्रत - मंगळा गौरी व्रत देखील अधिक मासच्या पौर्णिमेशी संबंधित आहे. मंगळा गौरी व्रत विवाहित स्त्रिया पाळतात आणि देवी गौरीची पूजा करतात. गौरीच्या आशीर्वादाने पतीला दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक आयुष्य लाभते. पौर्णिमेचे महत्त्व - पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण भगवान आणि चंद्राची पूजा करतात. चंद्राची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. चंद्रदोष दूर होतो, माणसाचे जीवन सुखी बनते. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तांदूळ, पांढरे वस्त्र, दूध, खीर, चांदी इत्यादी दान करू शकता. या चंद्राशी संबंधित वस्तू आहेत. घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; सोमवती अमावस्येला करा हे उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)