मुंबई, 12 मार्च : चाणक्य हे एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य यांच्या नीति कठीण काळामध्ये व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ओळखण्याची क्षमता येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्य नीतिनुसार आयुष्य जगण्याचा सल्ला दिला जातो.
चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत.
आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतिनुसार लक्ष्मीचा आशीर्वाद माणसाला सन्मान आणि सुख दोन्ही मिळवून देतो. त्यामुळेच लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर, आयुष्यामध्ये परिश्रम करावे लागतात आणि संघर्ष करावा लागतो. कठोर परिश्रम करणाऱ्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा होते. मात्र, संपत्ती आल्यानंतर माणसाने आपले पूर्वायुष्य विसरू नये. काही लोक पैसा वाढल्यानंतर आपला भूतकाळ विसरून जातात आणि अशा लोकांना जाणीव राहिली नसल्यामुळे लक्ष्मीची अवकृपा होते. चाणक्य नीतिनुसार लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
अहंकारापासून दूर राहा -
आचार्य चाणक्य यांच्या मते पैसा आल्यानंतर काही वाईट सवयी आपल्याला लागू शकतात. धनप्राप्ती वाढल्यानंतर अहंकार करू नये. अहंकार करणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी वाढतात. अहंकारी लोक लक्ष्मीला ही आवडत नाहीत. अहंकारामुळे लोकांना त्रास दिला तर, लक्ष्मीची अवकृपा होते.
क्रोधापासून दूर राहा -
आचार्य चाणक्य यांच्यामते क्रोधापासून दूर राहिलं पाहिजे. क्रोध हा सगळ्यात मोठा अवगुण आहे. क्रोधामुळे आयुष्यातलं सगळं सुख संपून जातं. क्रोधाला दूर ठेवून विनम्रतेने आचरण करावं आणि माणसं जोडण्याचा प्रयत्न करावा.
वाणी दोष -
चाणक्य सांगतात संपत्ती आल्यानंतर माणसाने मधुर वाणी सोडू नये. ज्या लोकांचे शब्द इतरांच्या भावना दुखावतात. जे लोक इतरांचा अपमान करतात. त्यांची साथ लक्ष्मी देखील सोडून देते. त्यामुळेच बोलताना आपली भाषा आणि आपल्या शब्दांवरती नियंत्रण असायला पाहिजे. चांगली वाणी लोकांना जवळ आणू शकते. लोकांना आपले शब्द आवडतील अशा शब्दांचा प्रयोग करावा वाईट शब्दांनी कुणाचंही मन दुखवू नये.
हे वाचा - लक्ष्मीची पाऊले अशा घराकडे आपोआप वळतात, आचार्य चाणक्यांनी सांगितलेत 3 उपाय
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Acharya chanakya, Chanakya niti