मुंबई, 25 जून : हिंदू धर्मात पूजा आणि धार्मिक विधी करताना अनेक नियम आणि परंपरांचे पालन केले जाते, ज्यामध्ये आचमन प्रक्रियेलाही विशेष महत्त्व आहे. मंत्रोच्चारांसह पवित्र पाण्याचे सेवन केल्याने शरीर, मन आणि हृदय आंतरिक शुद्ध होते, या प्रक्रियेला आचमन म्हणतात. हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये आचमन करण्याच्या पद्धतींचे वर्णन केले आहे. आचमन केल्याशिवाय उपासना अपूर्ण मानली जाते. पूजेच्या वेळी आचमन केल्याने उपासनेचे फळ अनेक पटींनी वाढते. या लेखात ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा आचमनचे महत्त्व, त्याची योग्य पद्धत, दिशा आणि मंत्र सांगत आहेत. आचमनाचे महत्त्व - धार्मिक ग्रंथांमध्ये आचमनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. आचमन केल्यानंतर हाताचा ओला अंगठा तोंडाला स्पर्श केल्यानं अथर्ववेदाची तृप्ति होते. आचमनाने मस्तिष्क अभिषेक केल्यानं भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते, आचमन केल्यानंतर जर दोन्ही डोळ्यांना स्पर्श केल्यास सूर्य, नाकपुड्यांना स्पर्श केल्यास वायू, आणि कानांना स्पर्श केल्यास सर्व ग्रंथी तृप्त होतात, असे मानले जाते. म्हणूनच पूजेपूर्वी आचमन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जाते.
आचमन कसे करावे? आचमन करण्यासाठी सर्व प्रथम पूजेचे साहित्य पूजेच्या ठिकाणी गोळा करावे. आता तांब्याच्या भांड्यात पवित्र गंगाजल भरा, जर गंगाजल उपलब्ध नसेल तर स्वच्छ पाण्यात गंगाजलाचे काही थेंब मिसळा. आता या तांब्याच्या भांड्यात छोटी आचमणी ठेवा. या पाण्यात तुळशीची पाने जरूर टाका. मनात देवाचे चिंतन करत असताना आचमनीचे पाणी घेऊन तळहातावर ठेवावे. मंत्रोच्चार करताना हे पवित्र पाणी 3 वेळा घ्या. आचमन घेतल्यानंतर कपाळावर आणि कानाला हात लावा. काही कारणाने आचमन करता येत नसेल तर उजव्या कानाला हात लावून आचमनची पद्धत पूर्ण मानली जाते. 4 दिवसात या राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! नोकरी-धंद्यात बक्कळ कमाईचे योग आचमनची दिशा आणि मंत्र जाणून घ्या - आचमन करायचे असेल तर दिशेचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आचमन करताना व्यक्तीचे तोंड उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला असावे. इतर कोणत्याही दिशेला तोंड करून आचमन करणे फायदेशीर नाही. आचमनादरम्यान काही मंत्रांचा जप करणे फायदेशीर मानले जाते. ‘ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम हृषिकेशाय नमः. या मंत्रांचा जप करताना उजव्या हाताच्या अंगठ्याने तोंड पुसून ओम गोविंदाय नमः मंत्राचा उच्चार करत हात धुवावेत. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

)







