मुंबई, 30 डिसेंबर: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून सिंह राशीचं 2023 या वर्षासाठीचं महिनानिहाय भविष्य सांगितलं आहे. सिंह (Leo) जानेवारी सर्वसाधारण : इतर व्यक्तींचे हेतू समजल्यानंतरही तुम्ही जोखीम पत्करण्याचा निर्णय घेऊ शकता. इतरांवर विश्वास ठेवणं हे तुमच्यासाठी सोपं झालं आहे. लवकरच एखादी ट्रिप घडू शकेल. तुम्ही दुर्लक्ष करत असलेली एखादी व्यक्ती अचानक, न सांगता समोर येईल. मित्रांची निवड शहाणपणाने करा. रिलेशनशिप : तुम्ही उदार आहात; मात्र ते एकतर्फीच असल्यासारखं वाटत आहे. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुमच्या अपेक्षांनुसार वागणार नाही. व्यग्र असलात, तर मोठी वचनं देऊ नका. करिअर : कामाच्या ठिकाणी सध्याच्या प्लॅनला बॅकअप असल्याची खात्री करा. तुमची हुकूमत एखादा सहकारी प्राप्त करण्याचा प्रयत्न करील. तुम्हाला समांतर काम करणारी एखादी व्यक्ती तुमच्यासाठी लाभाची ठरेल. लकी रंग : Ruby Pink फेब्रुवारी सर्वसाधारण : काही मुद्द्यांबद्दल तुमची मतं पारंपरिक असतील; मात्र सार्वजनिक ठिकाणी तुमचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असू शकेल. वेळेत कामं केल्यास प्रोजेक्ट लवकर पूर्ण करता येईल. काही महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होण्याची शक्यता असून, काही तरी नवी सुरुवात करण्याची संधी मिळू शकेल. सध्याच्या काळात धैर्य सापडणं ही अवघड बाब नाही. खूप दूरवरच्या एखाद्या व्यक्तीकडे तुमच्यासाठी एखादी चांगली बातमी असेल. रिलेशनशिप : सध्याच्या रिलेशनशिपसाठी हा काळ स्थिरतेचा असेल. तुमचे दृष्टिकोन वेगवेगळे असतील; मात्र शांतता राखण्यात रस असेल. एखादी बाहेरच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात गोंधळ घालू शकेल. करिअर : एखाद्या नव्या कल्पनेमुळे तुम्ही उत्साही राहाल. पैसे अडकण्याची परिस्थिती लवकरच सुधारण्याची चिन्हं आहेत. विद्यार्थ्यांना प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची गरज आहे. लकी रंग : Honey Orange मार्च सर्वसाधारण : तुमच्या संवेदनांचे लाड करा. कारण तुमचं मन शांत होण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचं रिलॅक्सेशन तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या दिवसांचं चांगलं प्लॅनिंग करण्यास मदत करू शकेल. आधी ज्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटलं नव्हतं ती व्यक्ती आता आकर्षक वाटू शकेल. आता तुम्हाला काही वेळ एकांतात घालवावासा वाटेल. तुमच्यावर वाढत असलेला एखादा कौटुंबिक ताण लवकरच सुटेल. सध्याच्या काळात कर्जासाठी विचारणा करणं टाळा. रिलेशनशिप : सध्याच्या हंगामात एकांतवास ही गुरुकिल्ली असू शकेल. शांतता आणि मानसिक सलोख्यासाठी तुम्हाला अंतर राखावंसं वाटेल. तुम्ही कोणाला तरी विचारू इच्छित असलात, तर साधी पद्धत किंवा साधा दृष्टिकोन काम करू शकेल. करिअर : तुमच्याकडून नवी प्रपोझल्स दिली जाऊ शकतील; मात्र अंमलबजावणीचा वेग वाढायला हवा. एखादी अधिकारी व्यक्ती नियमांमध्ये बदल करू शकेल. पाळीव प्राण्यांशी संबंधित व्यवसायामध्ये असलेल्यांच्या व्यवसायात अचानक मागणी वाढू शकेल. लकी रंग : Lime Green एप्रिल सर्वसाधारण : चांगल्य व्यक्तिमत्त्वांवर तुम्ही तुमचा चांगला प्रभाव पाडू शकाल. एखाद्या व्यक्तीने तुमची दखल घेतली असण्याची शक्यता असून, ती व्यक्ती कामासाठी तुमच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. तुमचा स्वतःवरचा विश्वास अनेक मार्गांनी पुनर्स्थापित होऊ शकतो. कोणी तरी दुसरी व्यक्ती तुमच्या क्षमतेची आणि जुन्या वैभवाची तुम्हाला आठवण आणि खात्री करून देऊ शकेल. रिलेशनशिप : तुमच्या सध्याच्या रिलेशनशिपमध्ये ताजेपणा आणण्याचा प्रयत्न करा. एखादी जवळची व्यक्ती तुमच्या जवळच्या मित्रमंडळींमध्ये सहभागी होऊ इच्छित असेल आणि तुम्हाला कदाचित ते नको असेल. तुमच्या पहिल्या डेटवेळी तुम्ही पूर्णपणे खुलेपणाने न बोलण्याचा निर्णय घेऊ शकता. करिअर : तुम्ही काही गुंतवणूक केली असेल, तर त्यात आता वाढीचा कल दिसू लागेल. अन्य एखाद्या व्यक्तीने स्वीकारलेली संधी कदाचित तुम्हाला आकर्षक वाटू शकेल. तुमची ऊर्जा वाचवा आणि ती नंतर कधी तरी दाखवा. सध्या फक्त निरीक्षण करा. लकी रंग : Pearl Grey मे सर्वसाधारण : तुम्ही एखादा प्लॅन ठरवला असेल; मात्र त्याची अंमलबजावणी करणं तुम्हाला अवघड जात असेल. साधी दैनंदिन कामं तुम्हाला व्यग्र ठेवतील. तुम्हाला पूर्ततेचा कालावधी अनुभवायला मिळेल आणि तुम्ही भूतकाळात केलेल्या कामांचं बक्षीस आता मिळू शकेल. एका वेळी एकाच गोष्टीबद्दल विचार करा. एका वेळी अनेक गोष्टींबद्दल विचार करण्यामुळे गोंधळ होऊ शकतो आणि विनाकारण ताण येऊ शकतो. ताजंतवानं वाटण्यासाठी एखाद्या छोटा ब्रेकचं प्लॅनिंग करू शकाल. रिलेशनशिप : तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या विशेष कृतीमुळे चेहऱ्यावर हसू खुलेल. विस्मृतीत गेलेलं एखादं जुनं पत्र तुम्हाला जुन्या आठवणींत रममाण करील. भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या दर्जाचं कौतुक होईल. करिअर : प्रगती करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या बहुतांश व्यक्ती तुम्हाला विनाकारण ताण देतील. विषारी, त्रासदायक कामाच्या वातावरणातून तुम्ही बाहेर पडण्याची गरज आहे. नवी नोकरी उपयुक्त ठरू शकेल. लकी रंग : Lavender जून सर्वसाधारण : अगदी मित्रांमध्ये असलात, तरी स्वतःच्या खऱ्या भावना व्यक्त करणं टाळा. नकळतपणे तुम्ही काही प्रकरणांत ओढले जात असल्याचं तुम्हाला जाणवेल. भावना संमिश्र असतील. कोणतेही निर्णय घाई-गडबडीत न घेण्याचा प्रयत्न करा. गोंधळला असलात, तर तो मुद्दा पुढे ढकला. दीर्घ श्वसनाचे व्यायाम करा. रिलेशनशिप : तुमच्याकडे आकर्षित झालेली एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकेल. ऑनलाइन डेटिंग अॅप्सवर वेळ घालवत असलात, तर तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक अस्वस्थ व्हायला होत असेल असं जाणवेल. हार्टब्रेक झाला, तर कोणत्याही प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. करिअर : तुम्हाला असे अनेक वेगवेगळे मार्ग सापडतील, जे तुमच्या कामाची व्याख्या बदलू शकतील. एखादी संधी अचानकपणे समोर येऊ शकेल. ती तुमच्या सध्याच्या संस्थेतलीच असण्याची शक्यता आहे. तुम्हाला उशिरापर्यंत काम करावं लागण्याची शक्यता आहे. लकी रंग : Mustard जुलै सर्वसाधारण : एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत तुमची अपॉइंटमेंट असली, तर त्यांचा वेळ आणि इन्व्हॉल्व्हमेंट यांचा आदर करा. तुम्हाला ज्या कल्पनांची अंमलबजावणी करणं शक्य नसेल, त्या कल्पनांबद्दल बोलणं टाळू शकता. सध्या आर्थिक परिस्थिती बिकट असली, तरी तुम्ही लवकरच त्यावर मात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. वरिष्ठांवर तुमचं इम्प्रेशन पडलं आहे आणि ते खोटं ठरणार नाही, यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. रिलेशनशिप : तुम्हाला कंटाळवाणं होणारे काही कालखंड येतील. तुम्हाला कदाचित थांबून, पुन्हा कसं होणार नाही याबद्दलच्या मार्गांचा विचार करावा लागेल. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये कदाचित दीर्घ काळ संपर्क तुटू शकेल. करिअर : अत्यंत निराशाजनक परिस्थितीमध्ये एखादं सरप्राइज मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रगतीच्या आलेखावर कोणी तरी जळत असण्याची शक्यता आहे. अन्य व्यक्ती तुमच्या सजेशन्सची कदर करत नसतील, तर कदाचित ती त्या पात्रतेची नसतील. लकी रंग : Egyptian Blue ऑगस्ट सर्वसाधारण : कोणी तरी मुद्दामहून तुमच्याशी वाद उकरून काढण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व संवेदनांचा वापर करून त्याला विरोध करा. Temperament हा मुद्दा असू शकेल; मात्र लवकरच ते शांत करण्याचे मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्हाला काम आणि ताण देऊन ओझं टाकण्याचा प्रयत्न इतरांकडून होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनात बऱ्याच काही गोष्टी सुरू आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल बोलणं महत्त्वाचं नाही. रिलेशनशिप : पार्टनरसोबत काही क्वालिटी टाइम व्यतीत करावासा वाटू शकेल. एखादं विवाहाचं स्थळ आलं असेल, तर ते कदाचित अपेक्षेप्रमाणे नसेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या जुन्या क्रशकडून पुन्हा प्रतिसाद मिळायला सुरुवात होऊ शकेल. करिअर : तुमचं काम अपेक्षेनुसार आहे; मात्र दृष्टिकोन कदाचित बदलला असेल. अनेकदा ते अत्यंत कठीण रूपात समोर येईल. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जात नसल्याबद्दल तुम्ही अस्वस्थ असलात, तर त्याबद्दल तुम्ही इतरांशी चर्चा करू नका. लकी रंग : Peanut Brown सप्टेंबर सर्वसाधारण : तुमच्या गरजा आणि इच्छा यांच्या अनुषंगाने नियती काही व्यवस्था करत असल्याचं तुम्हाला जाणवेल. तुम्हाला कृतज्ञ वाटेल. एखाद्या किरकोळ मुद्द्यावरून वादविवादांची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचा तुमच्याशी समन्वयाचा अभाव असू शकेल. त्यामुळे जोडीदाराकडून काही तरी वेगळंच सजेशन केलं जाऊ शकेल. तुम्हाला थोडासा वेळ काढावासा वाटेल किंवा अधिक स्पेसची गरज भासेल. आध्यात्मिक प्रवास उपयुक्त ठरू शकेल. रिलेशनशिप : तुम्ही गरजेच्या नसलेल्या एखाद्या गुंतागुंतीमध्ये अडकल्याचं तुमच्या लक्षात येईल आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. एखाद्या विश्वासू मित्राला त्याबद्दल सांगितल्यावर तुम्हाला कदाचित शांतता मिळू शकेल. इतरांचे संकेत योग्य रीतीने न ओळखण्याची चूक तुम्ही कदाचित करू शकाल. करिअर : तुम्ही वेळेत चांगली प्रगती करावी. तुम्हाला हवं असलेलं तुमच्या अपेक्षेनुसार मिळण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीसाठी अर्ज करत असलात, तर संधी उज्ज्वल आहेत. लकी रंग : Emerald Green ऑक्टोबर सर्वसाधारण : काही तरी घडेल असं तुम्ही गृहीत धरलं असेल, तर तुमची भीती खरी होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचं रूटीन अगदी सुरळीतपणे पार पाडू शकाल. काही मित्र तुम्हाला भेटू इच्छित असतील आणि तुम्हालाही त्यांना भेटण्याची उत्सुकता असेल. रिलेशनशिप : तुमच्या भूतकाळातल्या व्यक्तीबद्दलचे विचार तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. त्यांचं काय चाललंय हे पाहण्याची इच्छा तुम्हाला होऊ शकेल. तुमचं सावध मन त्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देणार नाही; मात्र तरीही त्यासाठीच्या इच्छेचाच विजय होईल असं दिसतं. तुम्ही रोमँटिक ट्रिपवर जाण्याची शक्यता आहे. करिअर : कोलॅबोरेशनची नवी कल्पना असेल, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सध्याचा काळ योग्य आहे. नोकरीसाठी योग्य व्यक्तीशी भेट होणं हे कदाचित तुमच्या नशिबात लिहिलेलं असेल. तुम्ही स्वतःवर शंका घेऊ नका. तुमची पुढची दिशा योग्य रीतीने आखलेली दिसत आहे. लकी रंग : Shadow Grey नोव्हेंबर सर्वसाधारण : तुमची विनम्रता, शालीनता तुम्ही कायम राखलीत, तर सगळ्या गोष्टी कोणत्याही विरोधाविना घडतील असं लक्षात येईल. तुमच्या मुलांकडून काही तरी चांगली बातमी मिळेल. फॅमिली गेट-टुगेदर होण्याची शक्यता आहे. पैशांचा प्रवाह सुरळीत असेल आणि ताणाची पातळी कमी असेल. रिलेशनशिप : वाद होतील अशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या कोणाच्या तरी भांडणात भाग घेतलात तर कदाचित तुमच्यावर अशी परिस्थिती उद्भवू शकेल. प्रिय व्यक्ती कदाचित काही कारणाने तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकेल. करिअर : सध्याच्या असाइनमेंटसाठी टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचा दृष्टिकोन योग्य राहील. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलात, तर आताचा काळ त्यासाठी चांगला आहे. आगामी इंटरव्ह्यूसाठी तुमचे कष्ट वाढवा. लकी रंग : Amber डिसेंबर सर्वसाधारण : मीडिऑकर जीवनात तुम्हाला ताण असेल आणि त्या परिस्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकाल. एखादा जुना सहकारी संपर्क साधू शकेल. काही संधी आहेत; मात्र त्यापैकी तुम्हाला एक मिळू शकेल. दाबून ठेवलेल्या भावना कदाचित सार्वजनिक पातळीवर व्यक्त होतील. आर्थिक प्रगती आता स्पष्टपणे दिसू शकेल. रिलेशनशिप : तुमचा जोडीदार त्याच्या कृतीमुळे तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकेल. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहात, त्या व्यक्तीची एखादी नवी बाजू समोर येईल. केवळ थ्रिल म्हणून अज्ञात गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका. करिअर : कामासाठीच्या Leisure Trip मुळे हवी असलेली शांतता मिळू शकेल. मिळालेल्या संधीच्या अनुषंगाने तुम्ही कौतुक करण्याच्या मूडमध्ये असाल. तुम्ही एखाद्या बाबीसाठी रांगेत असलात, तर आता लवकरच तुमची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. लकी रंग : Scarlet Red
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.