जाहिरात
मराठी बातम्या / Real Estate / WFH मुळे मुंबईतील प्राईम ऑफिस हबमध्ये नवे ट्रेंड्स, Real Estate क्षेत्रावर होतोय याचा परिणाम

WFH मुळे मुंबईतील प्राईम ऑफिस हबमध्ये नवे ट्रेंड्स, Real Estate क्षेत्रावर होतोय याचा परिणाम

WFH मुळे मुंबईतील प्राईम ऑफिस हबमध्ये नवे ट्रेंड्स, Real Estate क्षेत्रावर होतोय याचा परिणाम

रिअल इस्टेट क्षेत्रालाही (Real estate) कोरोनाचा मोठा फटका बसला. विशेषतः निवासी बांधकाम क्षेत्रापेक्षा कार्यालयीन जागांच्या (Office Space) व्यवसायाला अधिक फटका बसला.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई 07 सप्टेंबर : कोरोना विषाणूच्या साथीनं (Coronavirus Pandemic) जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडली. अनेक उद्योगधंदे बंद पडले. आता हळूहळू परिस्थिती सुधारत असून उद्योगधंदे, व्यवसाय पूर्ववत होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रालाही (Real estate) या साथीचा मोठा फटका बसला. विशेषतः निवासी बांधकाम क्षेत्रापेक्षा कार्यालयीन जागांच्या (Office Space) व्यवसायाला अधिक फटका बसला. कारण या साथीच्या काळात आयटी उद्योगासारख्या (IT Sector) मोठ्या क्षेत्रात घरून काम करण्याची पद्धत रूढ झाली, त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांची मोठ्या जागांची गरज कमी झाली. परिणामी व्यावसायिक कार्यालयीन जागांच्या क्षेत्रातही अनेक नवीन ट्रेंड्स (New Trends) रुजत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर कर्मचारी पुन्हा कार्यालयात जाऊ लागले होते; पण पुन्हा दुसऱ्या लाटेनं त्यावर निर्बंध आले. आता तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं आजही आयटीसारख्या अनेक क्षेत्रातील कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) करत आहेत. त्यामुळे कंपन्याही कार्यालयीन जागांबाबत काही नवीन पर्याय स्वीकारत आहेत. यामध्ये काही विशेष ट्रेंड दिसत आहेत. हब आणि स्पोक मॉडेल: व्यापारी आणि रिअल इस्टेट एक्झिक्युटिव्ह यांच्याविषयी सेव्हिल्स इंडियाद्वारे (Savills India) करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, 75 टक्के लोकांच्या मते, आणखी काही काळ 20 टक्क्यांपेक्षा अधिक मनुष्यबळ नॉन-ऑफिस म्हणजेच घरून काम करण्याची सुविधा मिळावी अशी अपेक्षा करत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी हब आणि स्पोक मॉडेलचा (Hub and Spoke Model) प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कंपनीचे मुख्य ऑफिस शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असले तरी शहरात ठिकठिकाणी स्पोक म्हणजेच लहान, लहान कार्यालये असतात. मुख्यतः ही छोटी कार्यालये कर्मचारी राहतात त्या परिसरापासून जवळ असतात. दिवाळीत ‘या’ कर्मचाऱ्यांची होणार चांदी, मिळणार 2,18,200 रुपये! किंमती कमी झाल्याचा लाभ घेण्याकडे कल : अनेक कंपन्यांनी गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), लोअर परेल आणि अंधेरी-कुर्ला रोड सारख्या प्रमुख व्यावसायिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा रिकाम्या पडल्या आहेत. लोअर परळमध्ये 22 टक्के ऑफिस स्पेस (Office Space) रिकामी आहे. तर बीकेसीमध्ये 24 टक्के जागा रिकामी आहे. यामुळे काही कंपन्यांना स्पर्धात्मक आणि परवडणाऱ्या दरांत या प्रीमियम ठिकाणी ऑफिससाठी जागा घेणं शक्य झालं आहे. त्यामुळं अनेक नवीन कंपन्या इथं लहान किंवा मध्यम जागा भाडेतत्वावर घेत आहेत. सध्या अशा व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणांना प्राधान्य देणाऱ्या कंपन्या आता बदलल्याचे दिसत आहे. ज्या कंपन्या आज लोअर परेलमध्ये आहेत त्या एकतर येथे राहू शकतात किंवा बीकेसीमधील नवीन सीबीडीमध्ये (CBD) स्थानांतरित होऊ शकतात. आता अनेक कंपन्या प्रीमियम ठिकाणी ऑफीस घेण्याऐवजी अधिक सहयोगी आणि सोशल स्पेसेसचा वापर करण्यावर भर देत आहेत. यामध्ये हॉट डेस्किंग (Hot Desking) म्हणजे जिथं बसण्याची जागा निश्चित नसते. त्यामुळे त्या जागेचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करणं शक्य होतं. त्या जागेची उपयुक्तता आणि कार्यक्षमता वाढते. त्याच प्रमाणे अनेक कंपन्या बॅक ऑफीससाठी कार्यालयासाठी ठाणे किंवा नवी मुंबईऐवजी अंधेरी-कुर्ला या भागात जागा घेण्यावर भर देत आहेत. तर ठाणे आणि नवी मुंबई या ठिकाणी आउटसोर्सिंग आणि कॉन्टॅक्ट सेन्टर्स उभारण्याला प्राधान्य मिळत आहे. कारण या व्यवसायात नफ्याचे प्रमाण अगदी कमी असते. यामुळे आता उपनगरांमध्ये  प्राईम ऑफिस कॉम्प्लेक्सचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांना कमी किंमतीत जागा मिळणे शक्य आहे. इंधन दरामुळे सामान्यांच्या खिशाला चाप, काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव मेट्रो कनेक्टिव्हिटी: मुंबईत 347 किलोमीटर अंतर कव्हर करणाऱ्या 14 मेट्रो लाईन्स (Metro Lines) तयार होत आहेत. यापैकी एक लाईन कार्यान्वित झालेली आहे तर आठ सध्या निर्माणाधीन आहेत. आणखी 5 लाईन्सना मंजुरी मिळाली असून त्याचं काम अजून सुरू व्हायचे आहे. दोन मेट्रो लाईन्स ऑक्टोबर 2022 मध्ये कार्यान्वित होतील आणि उर्वरित 2023 आणि त्यापुढील काळात सुरू होण्याची अपेक्षा आहे. मेट्रोमुळे जलद कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्यानं आगामी काळात व्यावसायिक क्षेत्रातील जागांचा प्राधान्यक्रम बदलण्याची शक्यता आहे. सध्याच्या काळात कर्मचाऱ्यांच्या प्रवासाच्या वेळेला महत्त्व प्राप्त झालं आहे. कार्यालयीन इमारतींची पुनर्रचना : व्यावसायिक जागांमध्ये कार्यालयीन इमारतीचीही पुनर्रचना होण्याची शक्यता वाढली आहे. रिकाम्या जागांचे प्रमाण वाढत असताना, डेव्हलपर व्यावसायिकदृष्ट्या आणि मनोरंजनाच्या दृष्टीनं जागेचा कसा वापर करता येईल याकडे लक्ष केंद्रित करत आहेत. आशियातील काही भागांमध्ये व्यावसायिक जागांमध्ये खालच्या मजल्यांचा वापर किरकोळ दुकानांसाठी केला जातो तर इतर मजले ऑफिस स्पेस आणि को-वर्किंग (Co Working) किंवा फ्लेक्स स्पेस (Flex Space) म्हणून वापरले जातात. वरचे मजले हॉटेल्ससाठीही वापरले जातात. अशाच प्रकारे, मुंबईत कार्यालयीन जागा, रिटेल, हॉटेल्स आणि मनोरंजन केंद्रे अशा पद्धतीनं वापरल्या जाऊ शकतात. तयार इमारतींच्या तुलनेत बांधकाम किंवा नियोजनाच्या टप्प्यातील इमारतींसाठी अधिक उपयुक्त ठरू शकेल. को-वर्किंग स्पेसचा वाढता वापर : गेल्या एका वर्षात अनेक कंपन्यांचे कार्यालयीन जागेसाठीचे लीज करार संपुष्टात आले असून, सध्या कामकाजासाठी जागेच्या वापराबाबत फ्लेक्झिबिलीटी (Flexibility) अधिक दिली जात असल्यानं को-वर्किंग स्पेस आणि व्यवस्थापनयुक्त कार्यालयांचा अधिक विचार केला जात आहे. त्यामुळं को-वर्किंग स्पेसच्या निर्मितीवरही भर दिला जात आहे. को-वर्किंग किंवा फ्लेक्स ऑफिसची पद्धत शहरभरच नव्हे तर संपूर्ण देशात जागा उपलब्ध करून देण्याची फ्लेक्झिबिलीटी देतात. त्यामुळे या क्षेत्रातील बर्‍याच ऑपरेटरनी त्यांच्या क्लायंटसाठी अशा जागांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता देण्यासाठी विविध शहरांमध्ये नेटवर्क तयार केले आहेत. ऑफिस सीटनुसार दीर्घकालीन लीजऐवजी सबस्क्रिप्शन (Subscription) आणि डे पास (Day-pass) तत्वावर जागा उपलब्ध होत आहेत. अनेक कंपन्या शून्य भांडवली गुंतवणूक आणि उच्च फ्लेक्झिबिलीटी लक्षात घेऊन को-वर्किंग जागांच्या शोधात आहेत. मुंबईतील गेलं एक वर्ष को-वर्किंग स्पेस क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरलं आहे. या क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी असलेल्या ‘अवफिस’ने मुंबई पोर्टफोलिओमध्ये 150,000 चौरस फुटांपेक्षा अधिक जागा असणारी पाच केंद्रे घेतली आहेत. इन्स्पायर को स्पेसेस आणि सहकाऱ्यांनी 100,000 चौरस फूट जागेची चार केंद्रे घेतली आहेत. देशाच्या विविध भागांमध्ये इतर ऑपरेटरच्या सहकार्याने नेटवर्क निर्माण करत ब्रूकफील्ड अॅसेट मॅनेजमेंटने RMZ चे सर्व्हिसड ऑफिस प्ले, Cowrks, विकत घेतले आहे. हे सर्व बदल लक्षात घेता कार्यालयीन जागांच्या बाबतीत 2021 हे नवीन संधी आणि नवीन ट्रेंड्स विकसित करणारे वर्ष ठरणार आहे. बदल कायम होत असतातच, परंतु आता ते पूर्वीपेक्षा अधिक वेगाने होत असून, जे व्यावास्सायिक ते झपाट्यानं बदल स्वीकारतील ते आपलं स्थान बळकट करू शकतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात