नवी दिल्ली, 07 सप्टेंबर: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या (
Central Government Employees) महागाई भत्ता (
DA), घरभाड्याबरोबरच (HRA) इतर भत्त्यांत वाढ केली आहेच पण आता दिवाळीला नरेंद्र मोदी सरकार त्यांना आणखी एक भेट देऊ शकते. सरकारने जुलै महिन्यात महागाई भत्त्यात 17 टक्के वाढ करून तो 28 टक्के तर घरभाडं भत्ता 24 टक्क्यांनी वाढवून ते 27 टक्के केला. आता महागाई भत्ता पुन्हा 3 टक्क्यांन वाढणार असून तो 31 टक्के होईल. कोरोना विषाणू महामारीच्या काळात केंद्र सरकारने महागाई भत्त्यातली वाढ मे 2020 मध्ये दिली नव्हती.
DA एरियर्सवर जून 2021 मध्ये झाली होती बैठक
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी (
Central Government employees) महागाई भत्त्यांत वाढ झाल्यानंतर आता DA एरियर्सची मागणी केली आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ जेसीएम, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग तसंच केंद्रीय अर्थ मंत्रालय यांच्या अधिकाऱ्यांची 26-27 जून 2021 ला बैठक झाली. त्या बैठकीत काय झालं याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा 17 टक्के महागाई भत्ता सरकारने साधारणपणे कोरोनाच्या काळात दीड वर्षं दिला नव्हता. या विषयातील तज्ज्ञांच्या मते, लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांना 11 हजार 880 रुपयांपासून ते 37 हजार 554 रुपयांपर्यंत DA एरियर्स मिळू शकतात. तसंच पे-स्केल लेव्हल -14 वर असलेल्या कर्मचाऱ्यांना डीएचे 1 लाख 44 हजार 200 ते 2 लाख 18 हजार 200 रुपये मिळू शकतात.
हे वाचा-इंधन दरामुळे सामान्यांच्या खिशाला चाप, काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव
महागाईची झळ बसू नये म्हणून दिला जातो डीए
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वेगवेगळे भत्ते दिले जातात. त्यामध्ये महागाई भत्ता म्हणजे Dearness Allowance दिला जातो. वाढत्या महागाईच्या त्या कुटुंबाला झळ लागू नये म्हणून हा भत्ता दिला जातो. गेल्यावर्षाच्या तुलनेत या वर्षी महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढला आहे. सरकारने जुलै 2021 मध्ये तो 28 टक्के केला होता. आता जर त्यात 3 टक्के वाढ झाली तर महागाई भत्ता 31 टक्क्यांवर पोहोचेल. याचंच एक उदाहरण बघूया-
जर एखाद्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 50 हजार रुपये असेल तर त्याला 15 हजार 500 डीए मिळेल. केंद्राप्रमाणेच राज्यांनीही डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, हरियाणा, कर्नाटक, राजस्थान आणि आसाम या राज्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा (
State Government employees) डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात वाढत्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते आणि तो भत्ता वेळोवेळी वाढवलाही जातो. त्यामुळे जर तुम्ही केंद्र सरकारी कर्मचारी असाल तर तुमचा डीए वाढेल, तुम्हाला डीए अरियर्स मिळू शकतात. हे सगळं दिवाळीच्या पगारातच आलं तर ती केंद्र सरकारने दिलेली दिवाळी भेटच ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.