जाहिरात
मराठी बातम्या / रिअल इस्टेट / Reak Estate मध्ये ट्रेंड बदलतोय! रिसेलपेक्षा नवं घर घेण्यावर भर; काय होणार परिणाम?

Reak Estate मध्ये ट्रेंड बदलतोय! रिसेलपेक्षा नवं घर घेण्यावर भर; काय होणार परिणाम?

Reak Estate मध्ये ट्रेंड बदलतोय! रिसेलपेक्षा नवं घर घेण्यावर भर; काय होणार परिणाम?

ग्राहक नवीन प्रकल्पातल्या म्हणजे बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या खरेदीकडे वळत असल्याचं दिसत आहे. कोरोना साथीच्या काळात मागणी कमी होतीच; पण त्यातही ग्राहक तयार घरांनाच अधिक पसंती देत होते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 11 मार्च : कोरोना साथीचा (Coronavirus Pandemic) सर्वांत मोठा फटका बसलेलं रिअल इस्टेट क्षेत्र (Real Estate Sector) आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नवीन प्रकल्प दाखल होत असून ग्राहकही (Buyers) खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळे देशातल्या रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळाल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, गृह खरेदी-विक्री क्षेत्रातली आघाडीची सल्लागार कंपनी असलेल्या अ‍ॅनारॉकने (Anarock) एक अभ्यास अहवाल सादर केला आहे. नवीन प्रकल्पात घर घेण्यास ग्राहकांची पसंती वाढत असल्याचा निष्कर्ष यात नोंदवण्यात आला आहे. टीव्ही 9 हिंदी ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अ‍ॅनारॉकने गुरुवारी, 10 मार्च रोजी जारी केलेल्या अहवालानुसार, देशातल्या रिअल इस्टेट क्षेत्रातल्या पहिल्या सात शहरांमध्ये 2021मध्ये झालेल्या घरांच्या एकूण विक्रीत नवीन प्रकल्पांचा (New Projects) वाटा सुमारे 34 टक्के आहे. 2020 मध्ये हे प्रमाण 28 टक्के, तर 2019 मध्ये 26 टक्के होते. त्यावरून आता ग्राहक नवीन प्रकल्पातल्या म्हणजे बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या खरेदीकडे वळत असल्याचं दिसत आहे. कोरोना साथीच्या काळात मागणी कमी होतीच; पण त्यातही ग्राहक तयार घरांनाच अधिक पसंती देत होते. दिल्ली-एनसीआर, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, पुणे, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद या सात शहरांमधल्या घरांच्या विक्रीचा कंपनीने आढावा घेतला आहे. 2021मध्ये या सात शहरांमध्ये 2.37 लाख घरं विकली गेली. त्यापैकी 34 टक्के घरं नवीन प्रकल्पांमधली होती. उर्वरित 66 टक्के घरं पूर्वी सुरू झालेल्या प्रकल्पांमधली आहेत. 2020 मध्ये या सात शहरांमध्ये एकूण 1.38 लाख घरांची विक्री झाली. त्यापैकी 28 टक्के घरं त्याच वर्षी सुरू झालेल्या प्रकल्पांतली होती. 2019 मध्ये विकल्या गेलेल्या एकूण 2.61 लाख घरांमध्ये नवीन प्रकल्पांचा वाटा 26 टक्के होता. रिअल इस्टेट क्षेत्रातल्या प्रसिद्ध विकासकांकडून (Developers) नवीन प्रकल्पातल्या घरांचा पुरवठा वाढल्यानं आणि गुंतवणूकदारांची त्याला चांगली मागणी लाभल्यामुळे हा कल दिसून आल्याचंही अ‍ॅनारॉकनं म्हटलं आहे. हे वाचा -  Property खरेदी करण्याआधी नक्की तपासून पाहा हे 5 दस्तावेज, नाहीतर होऊ शकते फसवणूक नवीन प्रकल्पातल्या घरांची सर्वाधिक विक्री हैदराबादमध्ये (Hyderabad) झाली असून, 2021 मध्ये तिथे 25,410 घरांची विक्री झाली. त्यापैकी 55 टक्के घरं याच वर्षी सुरू झालेल्या प्रकल्पांमधली होती. मुंबईत (Mumbai) नवीन प्रकल्पांमधल्या घरांची मागणी सर्वांत कमी होती. 2021 मध्ये एकूण 76 हजार 400 घरांच्या विक्रीपैकी केवळ 26 टक्के घरं ही नवीन प्रकल्पातली होती. ‘घरांच्या मागणीचं प्रमाण हळूहळू बदलत असलं, तरी ग्राहकांचं प्राधान्य अजूनही तयार घरांना आहे,’ असं अ‍ॅनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी म्हटलं आहे. हे वाचा -  Paytm ला RBI कडून झटका, पेटीएम पेमेंट्स बँकेला नवे ग्राहक जोडण्यावर बंदी रिअल इस्टेट क्षेत्रात आता तेजी दिसत असून, 2022 मध्ये भारतीय रिअल इस्टेट बाजारपेठेत मागणी (Demand) कायम राहील, असं मानलं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्र मजबूत होत असल्यानं परदेशी गुंतवणूकदारही (Forigen Investors) इथं गुंतवणूक करत आहेत. देशाच्या रिअल इस्टेट क्षेत्रातली परकीय गुंतवणूक 2017 ते 2021 पर्यंत 23.9 अब्ज डॉलर्स झाली आहे. त्या आधीच्या 2012 ते 2016 या कालावधीत ती फक्त 7.5 अब्ज डॉलर्स होती. 2017 ते 2021मध्ये त्यात तिपटीने वाढ झाली आहे. 2012 ते 2021 या कालावधीत भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रातली एकूण गुंतवणूक 49.4 अब्ज डॉलर्स इतकी वाढली असून, यात परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा 64 टक्के आहे. आगामी काळातही ही गुंतवणूक वाढत जाईल, अशी अपेक्षा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात