मराठी बातम्या /बातम्या /पुणे /कोरोना नियमांचं उल्लंघन करत पुण्यात बारमध्ये तरुण-तरुणींचा धिंगाणा, 200 हून जणांवर कारवाई, Watch Video

कोरोना नियमांचं उल्लंघन करत पुण्यात बारमध्ये तरुण-तरुणींचा धिंगाणा, 200 हून जणांवर कारवाई, Watch Video

पुण्यात (Pune) पुन्हा एकदा कोरोना (Corona Vius rules) नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं आहे. पोलिसांनी डेअरी येथील ऍलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रूप- टॉप हॉटेल अँड बारवर धाड टाकली.

पुणे, 15 ऑगस्ट: पुण्यात (Pune) पुन्हा एकदा कोरोना (Corona Vius rules) नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं आहे. जरी निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले असले तरी सोशल डिस्टन्सिंगचा (social distancing) नियम अजूनही लागू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी बारवर (Bar) धाड टाकली आहे. बारवर धाड टाकत पोलिसांनी तब्बल 200 हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं.

काल रात्री पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं जगताप डेअरी येथील ऍलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रूप- टॉप हॉटेल अँड बारवर धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी 200 हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं.

कोविड नियमांचे उल्लंघन करून ऍलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रूप टॉप बार सुरू होते. यामध्ये तरुण-तरुणी विकेंड पार्टी साजरी करत होते.

ऍलो गॅस्ट्रो लॉजमधून 113 तर एटीन डिग्री रूप टॉप हॉटेल अँड बार मधून 105 तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दारू पिऊन तरुण- तरुणी विकेंड पार्टी साजरी करत होते. विना मास्कच दंड आकारून आणि समज देऊन पोलिसांनी विकेंड पार्टी साजरी करणाऱ्या तरुण- तरुणींना सोडून दिलं.

First published:

Tags: Pimpari chinchawad, Pune, Pune crime