पुणे, 20 मार्च : दौंड तालुक्यातल्या पारगाव इथे तरुणाने व्हॉटसअॅप स्टेटसला स्वत:लाच श्रद्धांजली वाहत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. केडगाव परिसरात त्याने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडली असून त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आदित्य ओव्हाळ असं आहे. आदित्य ओव्हाळचे मूळ गाव शिरूर तालुक्यातील आंधळगाव हे आहे. शेतकरी कुटुंबातील आदित्यचे पारगाव इथे मेडिकलही होते. त्याचे चार महिन्यांपूर्वीच लग्नही झालं होतं. आता त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
आत्महत्येआधी आदित्यने स्टेटसला ११ फोटो लावले होते. त्यात शेवटचा फोटो टाकताना त्याखाली भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहिलं होतं. या स्टेटसनंतरच त्यानं रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. रेल्वे अंगावरून गेल्यानं त्याच्या शरिराचे तुकडे झाले होते. या प्रकरणाची पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news