Home /News /pune /

पुण्यातील येरवडा कारागृह पर्यटकांसाठी होणार खुलं, कशी मिळेल एण्ट्री? जााणून घ्या

पुण्यातील येरवडा कारागृह पर्यटकांसाठी होणार खुलं, कशी मिळेल एण्ट्री? जााणून घ्या

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

    पुणे, 23 जानेवारी : शाळा,कॉलेज, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या दृष्टीकोनातून महाराष्ट्र गृह विभाग प्रथमतःच जेल पर्यटन सुरू करत आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 'महाराष्ट्र शासनाचा गृहमंत्री या नात्याने मी याद्वारे जाहीर करतो की, 26 जानेवारी 2021 पासून येरवडा कारागृह हे कारागृह पर्यटनासाठी खुले असेल. तसेच ही योजना लवकरच महाराष्ट्रातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल,' अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. काय आहे जेल पर्यटनाचा उद्देश? विद्यार्था आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील. कारागृह हा समाजातील लोकांच्या प्रवेशासाठी मनाई असलेला भाग आहे. हा पर्यटन उपक्रम राबविताना सुरक्षेचे उल्लंघन होणार नाही, तसेच अनिष्ट घटकांना प्रवेश मिळणार नाही याची कारागृह प्रशासन योग्य तो काळजी घेईल. तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षता घेतली जाईल, असं गृहमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. हेही वाचा - राजकीय व्यक्तींच्या निवृत्तीचं वय किती असावं? भास्कर पेरे पाटलांनी दिलं उत्तर दरम्यान, पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन गाईड पुरविला जाईल. दररोज भेट देण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही. येरवडा कारागृहास पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज करताना पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या व्यक्तीची नांवे व मुलभूत तपशील याचा उल्लेख करणे आवश्यक राहील, असंही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Anil deshmukh

    पुढील बातम्या