गणेश दुडम, प्रतिनिधी पुणे, 28 जुलै : ऐन विकेंडच्या एक दिवसा आधी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळण्याची घटना घडली होती. त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे येणारी वाहतूक थांबली होती. अखेरीस कामशेत बोगद्याजवळ दरडीचा भाग हटवण्यात आला आहे. त्या ठिकाणाच राडारोडा हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक सुरू झाली आहे. गुरुवारी रात्री मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे, रात्री 2 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. 12 ते 2 या वेळेत सैल झालेल्या दरडी हटवण्यात आल्या. पण डोंगराच्या बाजूने आणखी काही भाग कामशेत बोगद्याजवळ कोसळला. जो भाग धोकादायक होता, तो पाडण्यात आला होता. आज दिवसभरात राडारोडा हटवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. अखेरीस संध्याकाळी हे काम पूर्ण झाले आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील किवळे ते कामशेत बोगद्याजवळ रस्त्यावर पडलेला राडा रोडा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे pic.twitter.com/VQEJwiLFyd
— News18Lokmat (@News18lokmat) July 28, 2023
दरड कोसळल्यामुले पुणे मुंबई द्रुतगतीवरील ब्लॉकची वेळ वाढवला होता. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरची वाहतूक तब्बल तीन तासानंतर सुरू झाली आहे. पावसामुळे अनेक अडचणींनाचा सामना करून सैल झालेले दगड माती काढण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र 2 ला सुरू होणाऱ्या कामाला उशीर झाला होता. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र पुण्यावरून मुंबईला जाणारी वाहतूक सुरू झाल्याने वाहन चालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. काय घडलं नेमकं? पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मातीचा ढिगारा कोसळला आहे. कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरच ही घटना घडली आहे. गुरुवारी पावणे नऊ वाजता घडलेल्या घटनेनंतर एका लेनवरून वाहतूक सुरू आहे. मातीचा हा ढिगारा बाजूला घेतल्यावर उर्वरित दोन लेन ही सुरू केल्या जाणार होत्या. मात्र अजून काम सुरू आहे. याच आठवड्यात रविवारी रात्री साडे दहा वाजता दरडीची पहिली घटना घडली ती मुंबई मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ तर दुसरी दरड त्याच मध्यरात्री 3 वाजता लोणावळ्याजवळ कोसळली होती. चार दिवसानंतर ही तिसरी घटना घडलेली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र एका लेनची वाहतूक ठप्प झाली होती.