हेही वाचा-पुणेकरांची चिंता वाढली; ग्रामीणपाठोपाठ आता शहरातही Delta Plusचा शिरकाव कुलाबा वेधशाळेच्या शुभांगी भुत्ते यांनी सांगितलं की, राज्यात पुढील तीन ते चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील तीन चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही भुत्ते यांनी वर्तवली आहे. हेही वाचा-कोरोना Delta Variant चं थैमान सुरू; सोमवार ठरला भयंकर! बुधवारी पुण्यासह सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची आस लागली होती. त्यानंतर आता राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं असून शेतकऱ्यांच्या चिंता दूर झाल्या आहेत.Good News for Farmers in Maharashtra 16 Aug, IMD मुंबई व नागपूर द्वारा जारी केलेल्या हवामानाच्या इशाऱ्या नुसार,राज्यात पुढचेे ३ दिवस मुसळधार पाऊस असण्याची शक्यता.खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता अधिक माहिती साठी IMDची वेबसाइट कृपया पहा pic.twitter.com/5a4hk6rp1L
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Pune, Weather forecast