जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / आघाडीला धक्का? ठाकरेंचे मित्रपक्ष वंचितचा चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांना पाठिंबा; तर कसब्यात..

आघाडीला धक्का? ठाकरेंचे मित्रपक्ष वंचितचा चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांना पाठिंबा; तर कसब्यात..

वंचितचा चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांना पाठिंबा

वंचितचा चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांना पाठिंबा

चिंचवडमध्ये वंचितचा शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांना पाठिंबा, पञक काढून दिला कलाटे यांना पाठिंबा

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पिंपरी चिंचवड, 16 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच डोकेदुखी वाढली आहे. आधी शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटासोबत युती केलेल्या वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची दुरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) बैठक घेण्यात आली. यानंतर परिपत्रक काढून वंचितने कलाटे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तर अद्याप कसबा पोटनिवडणुकीबाबत निर्णय घेतला नाही. वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय? पहाटेच्या शपथविधी नंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशिर्वाद होता असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपबरोबर जाणार नाही असा कुठेही खुलासा केलेला नाही. पिंपरी चिंचवड मध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता.‌ आणि त्यांनी  1 लाख 12 हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. परंतु तसे घडले नाही. वाचा - Eknath Shinde vs Uddhav Thackeray : कोर्टात सुनावणीनंतर ठाकरे गटाचे नेते सुखावले, तर शिंदे गटाचे नेते म्हणाले… गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण विचार करून भाजपला पिपरी चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले तर राहुल कलाटे थांबवू शकतात या मताला आली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील. यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड मधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

चिंचवडमध्ये तिरंगी लढत शिवसेना ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत चिंचवड पोटनिवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केला. ठाकरे गटाचे नेते आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर त्याचबरोबर सुभाष देसाई हे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन राहुल कलाटे यांच्याकडे गेले होते. शिवसेनेच्या नेत्यांनी कलाटे यांची भेट घेऊन समजूत काढली. पण, कलाटे यांनी अर्ज मागे घेतला नाही. कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक तिरंगी लढत होणार हे निश्चित झालं आहे. मात्र, या तिरंगी लढतीमुळे मतांचं विभाजन होऊन त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवारास होऊ शकतो असं मत राजकीय विश्लेषकाकडून व्यक्त केला जातंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात