मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात आता गुंडांची खैर नाही, पोलीस स्टेशनकडून आजपासून अनोखा उपक्रम!

पुण्यात आता गुंडांची खैर नाही, पोलीस स्टेशनकडून आजपासून अनोखा उपक्रम!

Pune Police : अशा प्रकारचे हे पहिलंच पोलीस स्टेशन असेल, असा दावा सह पोलीस आयुक्तांनी केला आहे.

Pune Police : अशा प्रकारचे हे पहिलंच पोलीस स्टेशन असेल, असा दावा सह पोलीस आयुक्तांनी केला आहे.

Pune Police : अशा प्रकारचे हे पहिलंच पोलीस स्टेशन असेल, असा दावा सह पोलीस आयुक्तांनी केला आहे.

पुणे, 19 मार्च : पुणे पोलिसांच्या (PUne Police) समर्थ पोलीस स्टेशनने पेट्रोलिंगसाठी सायकल वापरायचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज दहा सायकली पुणे महापालिकेच्या (PMC) वतीने समर्थ पोलीस ठाण्याला देण्यात आल्या. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पातून एकाचवेळी महत्त्वाचे 3 उद्दिष्टये साध्य होणार आहेत.

पोलिसांनी फिट राहणे, सोबतच शहरातल्या अरुंद गल्ली-बोळांमध्ये पोलिसांना पोहोचता येईल...त्यांचा वावर असावा...पोलिसांच्या रस्त्यावरच्या प्रेझेन्समुळे रस्त्यावरच्या गुंडगिरीला चाप बसावा, या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सुनील समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे सायकलीवर पेट्रोलिंग करण्यासाठी सायकली उपलब्ध करून द्याव्यात असा प्रस्ताव पाठवला होता. त्यासोबतच साडेतीनशे सीसीटीव्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत बसवण्याची परवानगी द्यावी आणि सीसीटीव्ही उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली होती.

या मागणीला मान्यता देत पुणे महापालिकेने दहा सायकली आणि सीसीटीव्ही समर्थ पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. आजपासून समर्थ पोलीस ठाण्याचे सगळे कर्मचारी सायकलवर पेट्रोलिंग करणार आहेत. यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आज पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार आणि सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस स्टेशनच्या स्तरावरचे अधिकृतरीत्या सायकलीवर पेट्रोलिंग करण्याचा पहिला मान समर्थ पोलीस ठाण्याला मिळाला आहे.

हेही वाचा - गृहमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चेवर राजेश टोपे यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग करण्यात येत आहे. कामाच्या ताणामुळे फिटनेसच्या बाबतीत कायम समस्याग्रस्त, व्याधिग्रस्त असलेल्या पोलिसांना सायकलिंगमुळे शारीरिक व्यायामाची संधीही मिळेल आणि परिणामी ते फीट राहायलाही मदत होईल.

एकीकडे पेट्रोलचे वाढते भाव, पोलीस आयुक्तालयाकडे कमी असलेली वाहनांची संख्या या सगळ्यावर मात करण्यासाठी सायकल हे मेंटेनन्ससाठीही उत्तम वाहन आहे, अशी भूमिका सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी मांडली आहे. तसंच अडीचशे सीसीटीव्ही वापरून पूर्ण पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सगळ्या गल्ली बोळांवर पोलिसांना लक्ष ठेवता येणार आहे. त्यासाठीची कंट्रोल रूम पोलीस ठाण्यातच तयार करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे हे पहिलंच पोलीस स्टेशन असेल, असा दावा सह पोलीस आयुक्तांनी केला आहे.

First published:

Tags: Pune news, Pune police