मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गृहमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चेवर राजेश टोपे यांची पहिली प्रतिक्रिया

गृहमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चेवर राजेश टोपे यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचं नाव गृहमंत्रिपदासाठी चर्चेत आलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचं नाव गृहमंत्रिपदासाठी चर्चेत आलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचं नाव गृहमंत्रिपदासाठी चर्चेत आलं आहे.

जालना, 19 मार्च : मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना NIA ने अटक केल्यानंतर गृहखात्याची मोठी नाचक्की झाली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) हे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसंच अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्रिपदाची जबाबदारी काढून घेण्यात येऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचं नाव गृहमंत्रिपदासाठी चर्चेत आलं आहे. मात्र स्वत: राजेश टोपे यांनी सध्या तरी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

गृहमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता राजेश टोपे यांनी स्पष्ट शब्दांत खोडून काढली आहे. 'राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष असून सर्व निर्णय पवार साहेबच घेतील. मात्र गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांच्याकडेच राहणार आहे. त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळच येणार नाही,' असा खुलासा राजेश टोपे यांनी केला आहे.

राजेश टोपे यांचं नाव का आहे चर्चेत?

राष्ट्रवादीकडून गृहमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे आणि यासाठी आता शरद पवार पुन्हा आपल्या धक्कातंत्राचा वापर करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

हेही वाचा - सचिन वाझे विरोधात भक्कम पुरावे, कोर्टात ATSने दावा केल्याने खळबळ

अनिल देशमुख यांच्याकडून गृहखात्याचा कारभार काढून घेण्यात आला तर या पदासाठी राष्ट्रवादीतून अजित पवार आणि जयंत पाटील हे स्पर्धेत असल्याचं आतापर्यंत बोललं जात होतं. मात्र आता या पदासाठी राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांच्या नावाचा विचार होत असल्याचं कळतंय.

सध्या राजेश टोपे यांच्याकडे आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी आहे. आरोग्यमंत्री म्हणून टोपे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचं राज्यभरातून कौतुक करण्यात आलं. त्यामुळे गृहखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच देण्याचा विचार राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे. मात्र असं असलं तरी सध्या राजेश टोपे यांनी या चर्चा खोडून काढल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.

First published:

Tags: Anil deshmukh, Rajesh tope