जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / प्रदीप कुरूलकर प्रकरणात ट्विस्ट; DRDO कडून घडली मोठी चूक!

प्रदीप कुरूलकर प्रकरणात ट्विस्ट; DRDO कडून घडली मोठी चूक!

प्रदीप कुरूलकर

प्रदीप कुरूलकर

डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांच्यावर हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 28 एप्रिल, वैभव सोनवणे :  डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांच्यावर   हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एटीएसकडून त्यांची चौकशी सुरू आहे. प्रदीप कुरूलकर यांची चौकशी करण्यासाठी एटीएसने डीआरडीओकडे कुरूलकर यांचा मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य साहित्य मागवलं होतं. मात्र डीआरडीओकडून एटीएसला प्रदीप कुरूलकर यांच्या लॅपटॉपऐवजी भलत्याच माणसाचा लॅपटॉप देण्यात आला होता. एटीएसने ही चूक डीआरडीओच्या लक्षात आणून दिली. नेमकं काय आहे प्रकरण?  डीआरडीओचे शास्त्रज्ञ असलेले प्रदीप कुरूलकर हे 2022 पासून पाकिस्तानी एजेंट्सच्या संपर्कात होते. या प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कुरूलकर यांना गोपनीयता कायद्याअंतर्गत पुण्यातून अटक केली. त्यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. पाकिस्तानच्या महिला गुप्त एजेंटनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून कुरूलकर यांच्याशी संपर्क केला होता. तेव्हापासूनच व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ते संपर्कात होते. एटीएस आधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत कुरूलकर यांनी महिलेशी व्हिडीओ चॅट केल्याचं मान्य केलं होतं. कुरूलकर यांनी नेमकी कोणती माहिती दिलीये आणि ती किती संवेदनशील आहे याचा तपास सध्या एटीएस बरोबरच रॅा सारख्या केंद्रीय यंत्रणा करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune , pune news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात