अनिस शेख, तळेगाव 18 ऑगस्ट: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पुणे जिल्ह्यात सर्वच पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केल्यानंतर लोणावळा खंडाळा, मावळ तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर पर्यटकांना पर्यटनासाठी जाण्यास बंदी आहे. पर्यटन स्थळावर जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करून पर्यटकांना पुन्हा मागे पाठविण्यात येत आहे. मात्र नजर चुकवून इंद्रायणी नदीवर गेलेल्या एका पर्यटकाचा नदीत बुडून मृत्यू झाला.
बंदी झुगारून पर्यटकांवर पोलिसांकडून गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहेत. परंतु छुप्या रस्त्याने अनेक पर्यटक पर्यटन स्थळावर पोहोचत आहेत. मावळ तालुक्यातील तळेगाव येथे असणार्या कुंडमळा या ठीकानी इंद्रायणी नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी पिंपरी गांधी नगर येथून तीन पर्यटक आज दुपारच्या सुमारास तळेगाव येथे आले होते.
वाहत्या पाण्यामध्ये चप्पल धुण्यासाठी गेलेला 30 वर्षीय युवक तोल जाऊन पाण्यात पडल्याने वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तबरेज पटेल असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
सोलापूर: सावकारी आणि मारहाण केल्याचं प्रकरण, NCPच्या नगसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
तळेगाव एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळतात तात्काळ घटनास्थळावर दाखलं होत पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु वाहत्या पाण्यामध्ये बुडालेला तरुण त्यांना आढळून आलेला नाही.
उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांना 5 पट दंड, आरोग्य मंत्र्यांचा इशारा
पोलिसांकडून एनडीआरएफच्या तुकड़ीला या घटनेबाबत माहिती देण्यात आली. परंतु अंधार झाल्याने बुधवार सकाळपासून शोध मोहीम सुरू होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.