जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Video : दिवे घाटामध्ये बाईकला धडक देऊन टँकर दरीत कोसळला; दोनजण जागीच ठार तर 4 गंभीर

Video : दिवे घाटामध्ये बाईकला धडक देऊन टँकर दरीत कोसळला; दोनजण जागीच ठार तर 4 गंभीर

Video : दिवे घाटामध्ये टँकर दरीत कोसळला

Video : दिवे घाटामध्ये टँकर दरीत कोसळला

पुणे सासवड मार्गावरील दिवे घाटामध्ये टँकर दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 8 मे : पुणे सासवड मार्गावरील दिवे घाटामध्ये टँकर दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोनजण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे.  तर काहीजण गंभीर जखमी झाले आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जाहिरात

काय आहे घटना? टँकर काही गाड्यांना धडक देऊन थेट दरीत कोसळला. या दोघेजण जागीच ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलीस वाग्निशामक दल दाखल झाले असून अपघातग्रस्त टँकर हा अ‍ॅसिडने भरलेल्या असल्यामुळे अ‍ॅसिडची गळती सुरू झाली आहे. या अपघातग्रस्त टँकरखाली किती जण अडकलेले आहेत. याबाबत टँकर उचलल्यानंतर समजू शकणार आहे. हा टँकर सासवड वरून हडपसरच्या दिशेला येत होता. शेवटच्या वळणावर उताराला असताना टँकर वाहनांना धडक देत दरीत कोसळला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident , Pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात