पिंपरी- चिंचवड, 05 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिचंवड म्हणजे गुन्ह्यांची नगरी झाली आहे. कारण सोमवारी रात्रीच्या सुमारास पिंपरी-दापोडीमध्ये अज्ञात टोळक्याकडून सराईत गुन्हेगार सुनील आरडेची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आजची सकाळ ही पिंपरीकरांसाठी धक्कादायक होती.
अज्ञात टोळक्यांनी सुनील आरडेची निर्घृण हत्या केली आहे. दगडाने ठेचून त्याला मारण्यात आलं आहे. या हल्ल्यामध्ये आणखी एकजण गंभीर जखमी झाला आहे. अनिकते चांदणे असं जखमीचं नाव आहे. तो सुनीलचा साथीदार आहे.
पूर्ववैमनस्यातून प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार त्यांनी प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहेत. तर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पिंपरीत होणाऱ्या अशा खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून सुनीलचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस घटनास्थळी संशयास्पद वस्तूंचा तपास करत आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासणार आहेत.
पुण्यात काय चाललंय! पोलीस हद्दीतच तरुणाचा खून
पुण्यात पोलीस स्टेशनच्या हद्दील हत्या झालेल्या गंभीर प्रकार घडला होता. अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोसावी वस्तीत एका तरुणाची हत्या करण्यात आली. पुण्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी पाहता सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
पोलीस स्टेशनच्या परिसरातच हत्या झाल्याने पुण्यात हल्लेखोरांना कसलंच भय उरलं नाही असचं दिसतंय. सकाळच्या दरम्यान तरुणाचा मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर याबाबत पोलिसांनी माहिती देण्यात आली.
दरम्यान, प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला. पोलीस परिसरातील लोकांची आणि मयत तरुणाच्या कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आलं. दरम्यान, अशा निर्दयीपणे एखाद्याची हत्या होते आणि आरोपी सहज फरार होतो. त्यामुळे आता पुण्यात सुरक्षा उरली का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
VIDEO : बिबट्या चढला थेट नारळाच्या झाडावर!