Home /News /pune /

तब्बल 5 महिन्यानंतर लालपरीने बस डेपो सोडला, फटाके फोडून स्वागत

तब्बल 5 महिन्यानंतर लालपरीने बस डेपो सोडला, फटाके फोडून स्वागत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 5 महिन्यांपासून एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती.

    पुणे, 20 ऑगस्ट : महाराष्ट्राची लाईफलाइन समजली जाणारी लालपरी अर्थात एसटी बस अखेर आता सुरू झाली आहे. जिल्ह्याअंतर्गत प्रवास करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर आज सकाळपासून एसटी बसेस धावण्यास सुरुवात झाली. नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत शासनाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. तर कुठे फटाके फोडून लालपरीचे स्वागत करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने आजपासून एसटी बसेस सुरू करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून पहिली आंतरजिल्हा बस सकाळी साडेआठला सुटली. तब्बल पाच महिन्यानंतर एसटीची आंतरजिल्हा बस सेवा सुरू झाली. स्वारगेट ते बोरीवली अशी ही बस आहे.  कोकण, सोलापूर, कोल्हापूरलाही स्वारगेटवरून गाड्या सुटल्या आहे. स्वारगेट बस स्थानकातून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मोठ्या दिमाखात ही शिवशाही आता कोल्हापूरकडे निघाली आहे. तर सोलापुरातून पहिली एसटी बसही पुण्याला रवाना झाली आहे. सोलापूर शहरातील एसटी बसस्थानकातून सकाळी ही बस पुण्याच्या दिशेनं रवाना झाली. या बसला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. एवढंच नाहीतर फटाके फोडून बसचे स्वागत केले आहे.   पंढरपूर डेपो मधून आंतरजिल्हा एस.टी वाहतूक सुरू सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरी मोठ्या मोठ्या शहरांसोबत खेडोपाडी धावत असते. कोरोना आला आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाउननंतर एकदा एसटी बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. पण प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असल्याने एसटीने सेवा बंद केली. आजपासून पंढरपूर आगारातून आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू झाली आहे. पंढरपूर आगारातून आज पहिली बस पुणे येथे सोडली आहे. सोबतच औरंगाबाद, लातूर, शिर्डी या ठिकाणी बस जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक ए.एस. सुतार यांनी दिली. आज पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद जेमतेम होता. मात्र, कोरोनाची भीती दूर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे एसटी बस सुद्धा निर्जंतुकीकरण केल्या जातील. जालन्यातील लालपरी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत होणार रुजू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 5 महिन्यांपासून एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती. एसटी बंद असल्यामुळे  उत्पन्न पूर्णपणे डाऊन झाले होते.   बससेवा सुरू करण्यासाठी मध्यंतरी आंदोलन देखील करण्यात आलं होते. अखेर सरकारने आजपासून एसटीची जिल्हाअंतर्गत बससेवा परत सुरू करण्याचे आदेश दिले. ज्यामुळे तब्बल 5 महिन्यांनंतर जालन्यातील लालपरी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूरमधून लालपरी निघाली आंतर जिल्हा बसफेरी सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून आजपासून नागपूर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरही लालपरी धावणार आहे. नागपूर विभागातून आज सकाळी अमरावती, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर,गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यासाठी बसेस सोडण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी बसची आंतरजिल्हा वाहतूक 31 मार्चपासून बंद केली होती. त्यामुळे महामंडळाला कोट्यवधींचा फटका बसला पाच महिन्यानंतर पुन्हा एसटी महामंडळाने आंतर जिल्हा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर विभागातून सकाळी 7 वाजता आंतर जिल्हा वाहतूक सुरू झाली असून लोकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या