मराठी बातम्या /बातम्या /पुणे /SSC Exam: दहावीच्या परीक्षेचं खूळ डोक्यातून काढा, नाहीतर ठार मारू; याचिकाकर्त्याला धमकी

SSC Exam: दहावीच्या परीक्षेचं खूळ डोक्यातून काढा, नाहीतर ठार मारू; याचिकाकर्त्याला धमकी

SCC Exam: राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात एक याचिका दाखल (petition filed in the court) करण्यात आली आहे.

SCC Exam: राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात एक याचिका दाखल (petition filed in the court) करण्यात आली आहे.

SCC Exam: राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात एक याचिका दाखल (petition filed in the court) करण्यात आली आहे.

पुणे, 30 मे: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वेगाने वाढत आहे. अशातच दहावी  आणि बारावीच्या परीक्षांचा (SSC and HSC Exam) प्रश्न गंभीर बनत चालला आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात न्यायालयात एक याचिका दाखल (petition filed in the court) करण्यात आली आहे. दहावीचं वर्ष महत्त्वाचं असून परीक्षा व्हायला हव्यात, यासाठी पुण्यातील धनंजय कुलकर्णी (Dhananjay Kulkarni) यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

संबंधित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर अद्याप सुनावणी सुरू आहे. असं असताना याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांना सोशल मीडियावर काही जणांनी धमकी द्यायला सुरू केली आहे. दहावीच्या परीक्षांचं खूळ डोक्यातून काढून टाका अन्यथा ठार मारू अशा आशयाची धमकी आरोपींकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी प्रथमेश पाटील आणि भगवान ढाकणे अशा दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी फिर्यादी कुलकर्णी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच दहावीच्या परीक्षेबाबतची याचिका मागे घेण्यास सोशल मीडियातून दबाब टाकला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून कोथरूड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा- दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी मांडली महत्त्वाची भूमिका

असं होणार दहावीच्या विद्यार्थ्यांचं मुल्यमापन

महाराष्ट्र सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून काही दिवसांतचं निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याचबरोबर या दहावीच्या विद्यार्थ्यांचं मुल्यमापन कसं केलं जाईल, याची रुपरेषाही सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

1.  विद्यार्थ्यांचे 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.

2.  विद्यार्थ्यांचे 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.

3. विद्यार्थ्यांचा 9 वीचा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 टक्के गुण याप्रमाणे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Maharashtra, Pune