जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुणेकर रिक्षाचालक जिंकले, अखेर 'रॅपिडो'ला लागला ब्रेक, कोर्टाने दिले स्पष्ट निर्देश

पुणेकर रिक्षाचालक जिंकले, अखेर 'रॅपिडो'ला लागला ब्रेक, कोर्टाने दिले स्पष्ट निर्देश

 बाईक टॅक्सीची सेवा वाचवण्यास आलेल्या कंपनीला त्यांच्या सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून सरसकट सर्व सेवा बंद...

बाईक टॅक्सीची सेवा वाचवण्यास आलेल्या कंपनीला त्यांच्या सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून सरसकट सर्व सेवा बंद...

बाईक टॅक्सीची सेवा वाचवण्यास आलेल्या कंपनीला त्यांच्या सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून सरसकट सर्व सेवा बंद…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 जानेवारी : पुण्यात रिक्षाचालक आणि रॅपिडो बाईक टॅक्सी सेवामध्ये वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे रिक्षाचालकांनी रॅपिडो सेवाला ब्रेक लावा अशी मागणी करत मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. अखेर बाईक टॅक्सीची सेवा वाचवण्यासाठी आलेल्या कंपनीला त्यांच्या सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. पुण्यातील ‘रॅपिडो’ बाईट टॅक्सी आणि रिक्षाचालकांचा वाद हा हायकोर्टामध्ये पोहोचला होता. अखेर या प्रकरणावर आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने रॅपिडो सेवा ही विनापरवाना असल्याचा ठपका ठेवला आहे. बाईक टॅक्सीची सेवा वाचवण्यास आलेल्या कंपनीला त्यांच्या सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून सरसकट सर्व सेवा बंद करा असे आदेश हायकोर्टाने दिले आहे. बाईक टॅक्सीसोबत कपंनीची रिक्षा, डिलिव्हरी या सेवाही विनापरवाना असल्याचं स्पष्ट झाले आहे. 20 जानेवारीपर्यंत राज्यभरातील सर्व सेवा बंद करण्यास कंपीनीची तयारी आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. (पुणे तिथे काय उणे, टेबलाघालून घेण्यातही पटकावला अव्वल क्रमांक, इतर शहरांची काय स्थिती?) मुंबई उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं ‘बाईक टॅक्सी’बाबत एक स्वतंत्र समिती तयार केली आहे. ही समिती लवकरच याबाबत आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती राज्य सरकारने कोर्टात दिली. मात्र तोपर्यंत ही सेवा तात्काळ बंद करण्याची मागणी राज्य सरकारने सुद्धा केली होती. अखेरीस हायकोर्टाने रॅपिडोची सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहे. रॅपिडो सेवा बंद झाल्यामुळे पुण्यात रिक्षाचालकांनी एकच जल्लोष केला आहे. रॅपिडो सेवा सुरू झाल्यापासून रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. अनेकांनी रॅपिडोला पसंती देत रिक्षाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे ठिकठिकाणी रिक्षाचालक आणि रॅपिडो रायडरमध्ये हाणामाऱ्याच्या घटना घडल्या होत्या. एवढंच नाहीतर रिक्षाचालकांनी पुण्यात बंद सुद्धा पुकारला होता. अखेरीस रिक्षाचालकांनी न्यायालयीन लढ्याची शर्यत जिंकली आहे. त्यामुळे रॅपिडोला आता ब्रेक लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात