मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यातील धक्कादायक प्रकार: फेसबुकवर मैत्री करत आर्थिक फसवणूक आणि नंतर अश्लील चाळे, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील धक्कादायक प्रकार: फेसबुकवर मैत्री करत आर्थिक फसवणूक आणि नंतर अश्लील चाळे, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Financial Fraud On Social Media : महिलांशी फेसबुकवर मैत्री करत एका व्यक्तीने आर्थिक फसवणूक केली, असा आरोप करण्यात आला आहे.

Financial Fraud On Social Media : महिलांशी फेसबुकवर मैत्री करत एका व्यक्तीने आर्थिक फसवणूक केली, असा आरोप करण्यात आला आहे.

Financial Fraud On Social Media : महिलांशी फेसबुकवर मैत्री करत एका व्यक्तीने आर्थिक फसवणूक केली, असा आरोप करण्यात आला आहे.

जुन्नर, 1 मार्च: जुन्नर (Junnar) तालुक्यातील ओतूर परिसरातील महिलांशी फेसबुकवर मैत्री करत सम्राट पारखे या व्यक्तीने आर्थिक फसवणूक (Financial Fraud On Social Media) केली, असा आरोप करण्यात आला आहे. तसंच तक्रार करणाऱ्या महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्नही या ठगाकडून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

आपण जनहित मानवाधिकार या राष्ट्रीय संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगत ओळखपत्र देण्याच्या नावाखाली सम्राट पारखे याने महिलांची आर्थिक लूट केली. तसंच काही महिलांनी या भामट्याचा खरा चेहरा उघडा पाडल्यावर या भामट्याने महिलांची बदनामी सुरू केली. अखेर एका पीडितने या भामट्याविरोधात ओतूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरातील महिलांशी फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्री करून सम्राट पारखे याने ओळख वाढवून जनहित मानव अधिकार या संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगितलं. तसंच या संस्थेवर काम करण्याचा आग्रह धरला आणि आरोपीने स्वतःची अनाथ व गरीब मुलांची संस्था असून या महिलांनी या संस्थेत प्रबोधन करावे अशी विनंती केली. मात्र नंतर याच महिलांची बदनामी केल्याचा प्रकार उघड झाला असून ओतूर पोलिसात उदापूर परिसरातील एका पीडित महिलेने सम्राट पारखे विरोधात फिर्याद दिली आणि पोलिसांनी पारखे वर गुन्हा दाखल केला आहे. पारखेच्या ओळखपत्रावर सिडको,नाशिक पवना नगर असा पत्ता आहे.

हेही वाचा - लॉकडाउनमध्ये साधला डाव, 4 मुलींशी लग्न करणारा भामटा अखेर जेरबंद!

आरोपीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून या फिर्यादी व इतर महिलांनी एकमेकांशी संपर्क साधला. त्यानंतर एकमेकांना भेटून सम्राट पारखेने इतर महिलांशी ओळख करून दिली. इतर महिलांना पारखेने जनहित राष्ट्रीय मानव अधिकार संस्थेचे ओळखपत्र देतो. तुम्ही प्रत्येकी 5 हजार रुपये जमा करा व मला द्या असे सांगितले. परिसरातील महिलांनी पारखेला पैसे जमा करून दिले. त्यानंतर तो जे काम करत होता या कामाची पीडित पाहिलेला शंका आल्याने या महिनेने पारखेची माहिती काढली असता पारखे हा संस्थेच्या नावाखाली महिलांना फसवत आहे हे समजल्यानंतर पीडित महिलेने राजीनामा देऊन काम करण्याचे सोडले.

दिनांक 1 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2.45 वाजता पीडितेच्या मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवरील एका ग्रुपवर पारखे याने त्याच्या मोबाईलवरून पीडितेच्या बाबतची लिंक पाठवून त्यात पीडिता फ्रॉड आहे. चुकीच्या मार्गाने काम करते. ऑफिसर लोकांना महिला पुरवते तसंच वेळोवेळी या गृपवर तसेच इतर महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पीडित महिला वाईट आहे, असं सांगून बदनामी केली. तसंच वेळोवेळी अश्लील भाषेत संभाषण करून बदनामी करून तुझे कपडे काढलेले फोटो अपलोड करतो असे सांगून पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलं. तसंच पीडितेवर जातीयवाचक केस करेल अशी धमकी दिली.

हा प्रकार 27 एप्रिल 2020 पासून 31 डिसेंबर 2020 पर्यंत वेळोवेळी घडल्याने पीडित महिनेने सम्राट पारखे विरोधात तक्रार दिली आहे.

First published:

Tags: Pune crime news, Pune police