मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लॉकडाउनमध्ये साधला डाव, 4 मुलींशी लग्न करणारा भामटा अखेर जेरबंद!

लॉकडाउनमध्ये साधला डाव, 4 मुलींशी लग्न करणारा भामटा अखेर जेरबंद!

कोरोना काळ असल्याने घरातीलच निवडक नातेवाईंकांसमोर या जोडप्याने लग्न केले होते.

कोरोना काळ असल्याने घरातीलच निवडक नातेवाईंकांसमोर या जोडप्याने लग्न केले होते.

कोरोना काळ असल्याने घरातीलच निवडक नातेवाईंकांसमोर या जोडप्याने लग्न केले होते.

मुंबई, 01 मार्च : मुंबई पोलिसांनी अशा एका भामट्या नवरेदवाचा  पर्दाफाश केला आहे. या भामट्याने अनेक तरुणींशी लग्न करुन त्या तरुणींची लाखो रुपयांना फसवणूक तर केलीच आहे पण त्यांचा क्रूरपणे शारीरिक छळ देखील केला आहे.

कोरोना काळ असल्याने लोकांच्या गर्दीत लग्न न करता घरातीलच निवडक नातेवाईंकांसमोर या जोडप्याने लग्न केले. यातील नवरी ही उच्च शिक्षित शिक्षक आहे पण तिझा नवरा आहे “ठग दुल्हा” आहे. कारण, कोरोनाचा काळाचा फायदा घेवून या भामट्याने या तरुणीशी कमी माणसांच्या उपस्थितीत लग्न केले पण या भामट्याचे आधीच 4 लग्न झाले होते हे या तरुणीला नंतर कळाले.

लग्नात मिळालेल्या मौल्यवान वस्तू, दाग- दागिने आणि रोकड मिळावी याकरता लग्न करायचे. एवढंच नाही तर यानंतरही जोर जबरदस्तीने त्या तरुणींच्या शरीराचे लचके तोडून त्यांना मारहाण करुन त्यांच्या माहेरच्यांकडून पैसे उकळायचे. त्यामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र पोलीस नोंदीत हा नराधम “ठग दुल्हा” म्हणून कु-प्रसिद्ध होता. या भामट्याचे नाव आहे आदित्य मेहता. याला मध्य प्रदेश मधील उज्जैन येथून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

हा भामटा नागपूर मधील नेलसन स्क्वेयर छिंदवाडा येथे राहणारा आहे. या नराधमाने मुंबईतील शिक्षक महिलेला कसं फसवलं. अखेर पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आदित्य मेहतावर कलम 498, 496, 376 आणि 377 म्हणजे घरगुती हिंसाचार, शारीरिक छळ, बलात्कार, मारहाण करणे, अनैसर्गिक शारिरिक छळ यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली. आदित्यला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने  8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसंच या आदित्य मेहता उर्फ ठग दुल्ह्याने कोणाला फसवले असेल तर त्यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क करावा, असं आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.

First published: