जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / भीमाशंकर देवस्थानचेही पुजारी संतापले, आसामच्या मुख्यमंत्र्यांना पुराव्यासह सुनावलं

भीमाशंकर देवस्थानचेही पुजारी संतापले, आसामच्या मुख्यमंत्र्यांना पुराव्यासह सुनावलं

भीमाशंकर मंदिर

भीमाशंकर मंदिर

श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योर्तिलींग महाराष्ट्रात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यावर आता भीमाशंकर मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 15 फेब्रुवारी :  श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी सहावे ज्योर्तिलींग आहे.  भीमाशंकराचे मंदिर हे पुणे जिल्ह्यात आहे. मात्र भीमाशंकराचे मंदिर महाराष्ट्रात नसून ते आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी केला आहे. यावरून आता राजकारण चांगलचं तापलं असल्याचं पहायला मिळत आहे. यावर आता  भीमाशंकर देवस्थानाचे मुख्य पुजारी मधुकरशास्त्री गवांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना त्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना आरसाच दाखवला आहे. नेमकं काय म्हणाले गवांदे?   ‘भीमा नदीकाठी वसलेले ज्योर्तिलिंग हे भीमाशंकर म्हणून अनादीकालापासून प्रसिध्द आहे, आसाम सरकारच्या म्हणण्यावर कोणीही विश्वास ठेवू नका असे आवाहन  भीमाशंकर देवस्थानचे मुख्य पुजारी मधुकरशास्त्री गवांदे यांनी केलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की,  अनादिकालापासून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे ज्योर्तिलिंग आहे. शिवपुराण आणि शिवलीलामृतात याचा उल्लेख आढळतो. शंकराचार्यांनी देखील सह्याद्री पर्वत रांगात भीमा नदीच्या काठी वसलेल्या भीमाशंकर ज्योर्तिलिंगावर काव्य रचले आहे’. हेही वाचा :      ‘उद्योग-रोजगार पळवल्यावर आता ज्योतिर्लिंग…’, भीमाशंकर वादावरून सुप्रिया सुळेंचं टार्गेट भाजप! ‘आसाममध्ये भीमाशंकर असल्याचे प्रथमच ऐकायला मिळाले आहे. भीमाशंकरमध्ये असलेलं शिवलिंग हे पार्वती आणि शकंर असे आहे. असे शिवमंदिर इतरत्र कुढेही आढळत नाही.  भीमाशंकर नावाने मंदिर असले म्हणजे ज्योर्तिलिंग होवू शकत नाही. देशातील इतर ज्योर्तिलिंगांबाबत देखील असेच वाद निर्माण केले गेले. यावर भाविकांनी विश्वास ठेवू नये’ असे अवाहन गवांदे गुरूजी यांनी केले आहे. काय आहे आसामच्या मुख्यमंत्र्यांचा दावा?  आसामच्या डाकिनी टेकडीच्या कुशित वसलेलं शंकराचं मंदिर हेच भीमाशंकर असल्याचा दावा सरमा यांच्याकडून करण्यात आला आहे.  आसाम राज्यातील डाकिनी टेकडीच्या कुशित वसलेले पमोही गुवाहाटी येथील शिवलींग हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी सहावे ज्योर्तीलींग श्री भीमाशंकर असून, याठिकाणी दि.18 रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीनिमीत्त आयोजीत कार्यक्रमात भाविकांनी मोठया संख्येनं यावं असं आवाहन एका जाहिरातीच्या माध्यमातून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी केलं आहे. यावरू आता राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात