जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / तुम्हाला माहितीये का पहिला अमृततुल्य चहा कुठे तयार झाला? Video

तुम्हाला माहितीये का पहिला अमृततुल्य चहा कुठे तयार झाला? Video

पहिला अमृततुल्य चहा

पहिला अमृततुल्य चहा

पुण्यातील पहिला अमृततुल्य चहा कोणता आहे हे माहिती आहे का?

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 20 जुलै :   चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, असं म्हंटलं जातं. आपल्या आजूबाजूला अनेक फक्कड चहाप्रेमी असतात. पुणे शहरात तर अमृततुल्य चहांची एक खास परंपरा आहे. जुन्या पद्धतीनं चहा देणारी ही अमृततुल्य पुण्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अमृततुल्य चहा हे पुण्याचं खास वैशिष्ट्य आहे. पुण्यात पहिल्यांदा अमृततुल्य चहा कुठं सुरू झाला हे माहिती आहे का? अस्सल पुणेरी चहाची चव तुम्हाला घ्यायची असेल तर ‘या’ 100 वर्ष जुन्या अमृततुल्य चहाला तुम्ही नक्की भेट द्यायला हवी. पुण्यातील गणेश पेठमध्ये हे विजय नरतेकर यांचं हे आद्य अमृततुल्य आहे. 130 वर्षांपूप्वी त्यांचे आजोबा आणि भावंड राजस्थानहून पुण्यात आले. त्यांनी सुरूवातीला पुण्यात मिठाईचं दुकान सुरु केलं. त्यानंतर त्यांनी सुमारे 100 वर्षांपूर्वी 1924 मध्ये पुणेकरांसाठी हा चहाचा स्टॉल सुरू केला.

News18लोकमत
News18लोकमत

नव्या व्यवसायाला सुरूवात म्हणून त्यांनी याचं नाव आद्य असं ठेवलं.  या चहाची चव अमृतासारखी असल्याचा त्यांचा दावा होता. त्यामुळे आमची स्वतःची चहा तयार करण्याची मोनोपॉली आहे. आम्ही आमचे मसाले तयार करतो.असं या दुकानाचे सभासद असलेले विजय नरतेकर यांनी सांगितले. पुण्यात काहीही घडू शकतं, आता आला बाहुबली पिझ्झा, किंमत ऐकून बसणार नाही विश्वास VIDEO 1924 साली हा चहा सुरू झाला त्यावेळी याची किंमत 1 पैसा होती. त्यानंतर काळानुसार याची किंमतही वाढली. आता 15 ते 40 रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये हा चहा मिळतो. या दुकानातील  ॲम्बिअन्सही मनाला प्रसन्न करणारा आहे. अनेक सेलिब्रेटींनी इथं आवर्जुन भेट दिली आहे, असं नरतेकर यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , Pune , tea
  • First Published :
जाहिरात
जाहिरात