• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • 'तुम्ही माझा DP ठेवत नाही', पुण्यात नवरा-बायकोतील भांडण थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं!

'तुम्ही माझा DP ठेवत नाही', पुण्यात नवरा-बायकोतील भांडण थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं!

मागील काही दिवसापासून सोशल मीडियामुळे (Social Media) होणारी भांडणं भरोसा सेलमध्ये येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

  • Share this:
पुणे, 5 मार्च : आयुष्याची एकत्र वाटचाल करत असताना नवरा-बायकोमध्ये भांड्याला भांड लागत असतं. हा वाद कुठल्याही मुद्द्यावर होऊ शकतो. नवरा वेळ देत नाही, गिफ्ट देत नाही, एखादा स्पेशल दिवस विसरला अशा कारणांसाठी अनेकदा दोघांमध्ये वाद होत असतात. मात्र नवरा-बायकोचं डोकं चक्रावून टाकणारं भांडण पुणे पोलिसांकडे (Pune Police) आलं आहे. कौटुंबिक तंटे सोडवण्यासाठी पुणे पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये समुपदेशन केलं जाते. घरगुती भांडण कायद्याच्या कक्षेत येण्यापूर्वीच समंजसपणे सोडवण्याचं काम भरोसा सेलमध्ये केलं जातं. मागील काही दिवसापासून सोशल मीडियामुळे होणारी भांडण भरोसा सेलमध्ये येण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच आणखी एका भांडणाची भर पडली आहे. नवरा-बायको दोघेही उच्चशिक्षित आहेत. बायकोला वडील नसल्यामुळे नवरा तिच्या आईची आणि बहिणीची काळजी घेतो. हे सगळं असलं तरी त्यांच्यात वाद होत होते आणि त्याला कारण होतं की नवरा त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीवर (WhatsApp DP) बायकोचा फोटो ठेवत नाही. अखेर भरोसा सेलमध्ये दोघेजण आले, तिथल्या पोलिसांनी त्यांची समजूत घातली आणि हे भांडण मिटलं. हेही वाचा - पुण्याच्या फ्लाइटमध्ये सापडला कोरोना रुग्ण; टेक ऑफ आधी सगळ्या प्रवाशांना उतरवलं सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावानंतर अशीच भांडणं सध्या अनेक ठिकाणी होताना दिसत आहेत. याच मुद्द्यावर 'न्यूज18 लोकमत'ने काही तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. 'बायकोचा फोटो डीपीवर ठेवायला हरकत काय. महिला एवढ्या नटून-थटून तयार होतात आणि त्यांचा फोटो ठेवला नाही तर त्या नाराज होणं हे साहजिक आहे. लग्न केलं... प्रेम करता, तर लपवता का?' अशा प्रतिक्रिया या तरुणांकडून समोर आल्या.
Published by:Akshay Shitole
First published: